agriculture news in marathi, There is no place to store mung bean in the warehouse | Agrowon

सांगलीच्या गोदामांत मूग, उडीद ठेवायला जागाच नाही
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

सांगली ः बाजार समितीतील नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केलेली तूर केंद्रीय गोदामांमध्ये २१०० टन शिल्लक आहे. यामुळे गोदामांमध्ये चालू हंगामातील हमीभावाने खरेदी करावयाची सोयाबीन, उडीद आणि मूग ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.

सांगली ः बाजार समितीतील नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केलेली तूर केंद्रीय गोदामांमध्ये २१०० टन शिल्लक आहे. यामुळे गोदामांमध्ये चालू हंगामातील हमीभावाने खरेदी करावयाची सोयाबीन, उडीद आणि मूग ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केंद्र सांगलीला सुरू केले जाते. गेल्या वर्षीही सांगलीतील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानुसार शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, उडीद, मुगाची हमीभावाने विक्री केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वीची ७०० टन तूर तर गेल्यावर्षीची १४०० टन तूर अजून केंद्रीय गोदामांमध्ये पडून आहे. या तुरीची खरेदी मिलने केलेली नाही. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र सांगलीत सुरू केले. तर खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सांगली येथे सुरू होणारे खरेदी केंद्र हे विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात उडिदाची १५ हजार १३३ हेक्‍टरवर पेरा झाला आहे. तर सोयाबीनचा ३८ हजार ८७० हेक्‍टरवर पेरणी झाली. सध्या जिल्ह्यात आगाप पेरणी केलेली सोयाबीनची काढणी सुरू आहे. मात्र, हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन कुठे विकायचे, असा प्रश्‍न उपस्थित करू लागले आहे.

खरेदी संघाद्वारे हमीभाव केद्रांसाठी प्रस्ताव
जिल्ह्यात सांगली, विटा आणि तासगाव या तीन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र, या तिन्ही खरेदी संघाद्वारे हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू करण्याची मंजुरी मिळालेली नाही, असे असताना सांगलीतील केंद्रीय गोदामांमध्ये शेतीमाल ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. तर खरेदी केंद्र कुठे सुरू करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

 

इतर बातम्या
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...