agriculture news in marathi, there is no time to take ratool | Agrowon

फरदड घेऊ नका म्हणण्याची उरली नाही वेळ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

औरंगाबाद : कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या विनाशकारी आक्रमणानंतर यंदा नोव्हेंबरपासूनच कपाशीचे पीक काढून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बोंड अळीचे आक्रमण रोखण्यासाठी कपाशीचे पीक शक्‍य तितक्‍या लवकर काढून टाकण्याचे आवाहन कृषीच्या यंत्रणेसह तज्ज्ञांनी आधीच केले आहे. त्यामुळे फरदड घेऊ नका म्हणण्याची गरज यंदा पडणार नाही, असेच काहीसे चित्र कपाशीबाबत आहे.

औरंगाबाद : कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या विनाशकारी आक्रमणानंतर यंदा नोव्हेंबरपासूनच कपाशीचे पीक काढून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बोंड अळीचे आक्रमण रोखण्यासाठी कपाशीचे पीक शक्‍य तितक्‍या लवकर काढून टाकण्याचे आवाहन कृषीच्या यंत्रणेसह तज्ज्ञांनी आधीच केले आहे. त्यामुळे फरदड घेऊ नका म्हणण्याची गरज यंदा पडणार नाही, असेच काहीसे चित्र कपाशीबाबत आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अहवालानुसार औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत यंदा १५ लाख ९३ हजार ९२७ शेतकऱ्यांनी १० लाख ४८ हजार ५३९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली. हे सर्वच्या सर्व क्षेत्र बोंड अळीने बाधित झाले आहे.

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांतील ४८ तालुक्‍यात यंदा ५ लाख ४३ हजार ७०५ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. यामध्ये लातूर जिल्ह्यातील त्यापैकी ४ लाख ७६ हजार ४४ हेक्‍टर क्षेत्र बोंडअळीने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याने त्याचा थेट परिणाम कपाशीच्या उत्पादनावर झाला.

पहिल्या दुसऱ्या वेचणीनंतर शेतकऱ्यांना कपाशीची वेचणीच करण्याची गरज उरली नसून, कपाशीला बोंड दिसत असले तरी ते अळ्यांचा प्रादुर्भाव झालेलेच असल्याने वेचणीच्या खर्चाला परवडणारी नाहीत. त्यामुळे कपाशीचे पीक काढून ते नष्ट करत त्याऐवजी शक्‍य असल्यास रब्बीचे पीक घेण्याचा पर्याय निवडताना शेतकरी दिसत आहेत.

सव्वादोन लाखांवर तक्रारी
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अहवालानुसार जवळपास सव्वादोन लाखावर शेतकऱ्यांनी त्यांच्या कपाशीच्या पिकात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाल्याची तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारींपैकी जवळपास बावीसशे हेक्‍टरवर कपाशी पिकाच्या नुकसानीची तक्रार निवारण समितीने पाहणी केली आहे. या आकड्यांमध्ये सातत्याने भरच पडते आहे.

कपाशीचे पीक नष्ट करताहेत ही समाधानाची बाब आहे. पुढच्या हंगामाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते पाऊल आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकाचा कंपोस्ट वा कांडी कोळसा करण्यावर भर द्यावा. पिकात थेट रोटावेटर मारण्याचे टाळावे.
- डॉ. नितीन पतंगे,
कीटकशास्त्रज्ञ एनएआरपी औरंगाबाद.

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...