पंढरपुरात दर्शनबारीशिवाय विठ्ठल दर्शन नाही

पंढरपुरात दर्शनबारीशिवाय विठ्ठल दर्शन नाही
पंढरपुरात दर्शनबारीशिवाय विठ्ठल दर्शन नाही

सोलापूर  : पंढरपुरात आषाढी वारी सोहळा १३ ते २७ जुलै कालावधीत होणार आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या लक्षात घेता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी केलेल्या दर्शनबारीशिवाय मंदिराभोवती असलेल्या कोणत्याही इमारतीच्या दरवाजातून मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी काढला आहे.  पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक वारकरी दर्शनासाठी येतात. त्यामुळे १३ ते २७ जुलै या आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (४) अन्वये सदर आदेश लागू करण्यात आले आहेत.

आदेशानुसार विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर सार्वजनिक पूजा व इतर धार्मिक विधीच्या वेळा सोडून भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे. मंदिर समितीने केलेल्या दर्शनबारीतूनच भाविकांना दर्शनाला सोडले जाईल. अन्य कोणत्याही दरवाजातून सोडण्यात येणार नाही. महिलांसाठी वेगळी दर्शनरांग नाही. उत्तर दरवाजातील व्हीआयपी गेटने फक्त समिती निमंत्रित पाहुणे तसेच मंदिर समितीने परवानगी दिलेल्या निमंत्रित व्यक्तींनाच मंदिर समितीच्या प्रतिनिधीने खात्री करून दिल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांनी मुखदर्शनानंतर उत्तर दरवाजातूनच बाहेर पडावे. तसेच पश्‍चिम दरवाजासमोरच्या मोकळ्या जागेत गर्दी होणार नाही याचीही दक्षता भाविकांनी घ्यावी.

मंदिराच्या सोळखांबीजवळ उत्तरेकडील दरवाजानेही भाविकांना येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्शनबारीनुसार भाविकांना दर्शन मिळावे यासाठी  नियोजन करून मंदिराच्या आतील सर्व दरवाजे बंद ठेवण्यात यावेत, हे दरवाजे आपत्कालीनप्रसंगी व प्रशासकीय कामाच्या आवश्‍यकतेनुसार उघडण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com