agriculture news in marathi, There is a possibility of rotation from 'Jaikwadi' for Rabbi | Agrowon

रब्बीसाठी ‘जायकवाडी’तून आवर्तनाची शक्यता धूसर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

परभणी ः  पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप निम्माही उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता धूसर आहे. सध्या संरक्षित पाणी आवर्तन सुरू आहे. परंतु पाण्याचा प्रवाह कमी असल्याने परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डाव्या कालव्याच्या प्रवाहाचा वेग वाढविणे आवश्यक आहे.

परभणी ः  पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप निम्माही उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता धूसर आहे. सध्या संरक्षित पाणी आवर्तन सुरू आहे. परंतु पाण्याचा प्रवाह कमी असल्याने परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डाव्या कालव्याच्या प्रवाहाचा वेग वाढविणे आवश्यक आहे.

यंदा कमी पावसामुळे तसेच वरच्या बाजूच्या धरणातून पाणी सोडण्यात न आल्यामुळे जायकवाडी धरणात ४७.६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. पावसाचा खंड पडल्यामुळे सप्टेंबर अखेरीस जायकवाडीच्या डाव्या कालव्याद्वारे २ हजार क्युसेकने तर उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेकने संरक्षित पाणी आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे रविवारी (ता. ७) या धरणांमध्ये ४०.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

या धरणावर अवलंबून असलेल्या शहरांच्या पाणीपुरवठा योजना, उद्योगधंदे, परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र यांच्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवला जाणार आहे. त्यामुळे सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहणार नाही. वरच्या भागातील धरणातून जायकवाडीच्या हिश्श्याचे पाणी सोडले तर उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊन रब्बीत एखाद-दुसरे पाणी आवर्तन मिळू शकेल. परंतु, यंदा आधीच कमी झालेल्या पावसामुळे यंदा जायकवाडी धरण गतवर्षीप्रमाणे पूर्ण भरले नाही. सध्या संरक्षित पाणी आवर्तन सुरू असल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे डाव्या तसेच उजव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता दिसत नाही.

आवर्तनाचा प्रवाह वाढण्याची गरज
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक ९७ हजार ४०० हेक्टर लाभक्षेत्र एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे. सध्या कापूस, ऊस, तूर आदी पिकांसाठी तसेच रब्बी पिकांच्या पेरणीसाठी संरक्षित पाणी आवर्तन २ हजार क्युसेक्स प्रवाहाने सोडण्यात आले आहे. कालव्याच्या दुरवस्थेमुळे पाण्याची नासाडी तसेच कालव्याच्या प्रवाहाचा वेग देखील कमी आहे. केवळ मुख्य कालवे तसेच शाखा कालव्याद्वारे पाणी वाहत आहे. परंतु वितरिका आणि चाऱ्यांद्वारे शेतामध्ये पाणी पोचण्यास वेळ लागत आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना या पाणी आवर्तनाचा सिंचनासाठी उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. प्रवाहाचा वेग वाढण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरंक्षित पाणी आवर्तनाचा लाभक्षेत्रातील जास्तीजास्त शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी कालव्याच्या प्रवाहाचा वेग वाढण्याची गरज आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...