agriculture news in marathi, There is strong rain in the Kolhapur era | Agrowon

कोल्हापूरात पावसाचा जोर कायम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवार (ता. २५) सायंकाळपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. मंगळवार (ता. २६)पर्यंत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. पश्‍चिमेकडील तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. तर पूर्वेकडील तालुक्‍यात थांबून थांबून हलका पाऊस सुरू होता. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी वाढू लागले आहे. मंगळवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला.

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवार (ता. २५) सायंकाळपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. मंगळवार (ता. २६)पर्यंत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. पश्‍चिमेकडील तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. तर पूर्वेकडील तालुक्‍यात थांबून थांबून हलका पाऊस सुरू होता. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी वाढू लागले आहे. मंगळवारी सकाळी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला.

मंगळवारी (ता. २६) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ५५०.०६ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक १३०.०० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ४५.८४ टक्के पाऊस झाला आहे. गगनबावडा, शाहूवाडीसह सर्वच धरणक्षेत्रांत पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्‍याच्या पश्‍चिम धामोड भागात काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून तुळशी नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास केळोशी येथील लघू पाटबंधारे प्रकल्प जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, खामकरवाडी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे.

तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये याप्रमाणे हातकणंगले १९.७५, शिरोळ ५.४२, पन्हाळा ४०.५७, शाहूवाडी ५४.८३, राधानगरी ६९.००, करवीर ३२.५४, कागल ४२.००, गडहिंग्लज १३.८५, भुदरगड ४२.६०, आजरा ४०.०० व चंदगड ५९.५०.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...