agriculture news in marathi, they say bye bye to closing year by cleaning fort | Agrowon

गड स्वच्छ करुन 'ते' देतात सरत्या वर्षाला निरोप...
सचिन शिंदे 
सोमवार, 1 जानेवारी 2018

कऱ्हाड, जि. सातारा : कोणी फटाके लावून, कोणी डीजे डॉल्बी लावून तर कोणी थीरकणाऱ्या गाण्यांच्या तालावर नाचत नव्या वर्षाचे स्वागत करते. त्याचवेळी सरत्या वर्षाला निरोपही देतात. मात्र शहरासह तालुक्यातील काही युवकांनी वसंतगडावर स्वच्छता मोहिम राबवून सरत्या वर्षाला निरोपही दिला अन् नव्या वर्षात गडाच्या डागडुजीचा संकल्प केला. सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्तंय तब्बल आठ तासापेक्षा जास्त काळ वसंतगडावर जमलेल्या पन्नासहून अधिक युवकांनी गड स्वच्छ केला.

कऱ्हाड, जि. सातारा : कोणी फटाके लावून, कोणी डीजे डॉल्बी लावून तर कोणी थीरकणाऱ्या गाण्यांच्या तालावर नाचत नव्या वर्षाचे स्वागत करते. त्याचवेळी सरत्या वर्षाला निरोपही देतात. मात्र शहरासह तालुक्यातील काही युवकांनी वसंतगडावर स्वच्छता मोहिम राबवून सरत्या वर्षाला निरोपही दिला अन् नव्या वर्षात गडाच्या डागडुजीचा संकल्प केला. सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्तंय तब्बल आठ तासापेक्षा जास्त काळ वसंतगडावर जमलेल्या पन्नासहून अधिक युवकांनी गड स्वच्छ केला. गडाचे एतिहासिक महत्व नव्या पिढीला कळावे, म्हणून तरूणांनी गड स्वच्छतेसाठी घेतलेल्या पुढाकाराने नव्या वर्षाची सुरवात झाल्याच आज अनुभव आला. 

येथून सुमारे दहा किलोमीटरवर असलेला एतिहासिक वसंतगड अत्यंत देखणा गड आहे. अलीकडे त्याच्या स्वच्छतेसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र त्याच परिसरात राहणाऱ्या ग्रामीण बागातील युवकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्या गडावर स्वच्छतेला प्रारंभ झाला आङे. त्याला वसंतगड श्रमदान मोहिम असेही नाव देण्यात आले आहे. कोणेचाही पुढाकार नाही, कोणाच्याही नावे ही मोहिम नाही, कोणालाही त्यात आपले नाव पुढ करता येवू नये, यासाठी सामुहीक प्रयत्नाला प्रादान्य देवून वसंतगड श्रमदान मोहिम असे त्याचे नाव दिले आहे. तलबीड बाजूने असलेल्या पायऱ्यातून स्वच्छता करण्यात येते. गतवर्षापासून काही युवक एकत्र येवून तो उपक्रमन हाती घेत आहेत. गडाची स्वच्छता रहावी, त्याचे एतिहासिक महत्व टिकून रहावे, स्वराजाचे साक्षीदर असलेले तेथील ठिकाण स्वच्छ असावीत, याच उद्देशाने तेथे मोहिमेस सुरवात झाली. 

काही वर्षापूर्वी सुरू जालेल्या मोहिमेने आता लोक चळवळीचे स्वरूप गेतले आहे. गत वर्षापासून सरत्या वर्षाला निरोप द्यायला व येमाऱ्या नविन वर्षाचे स्वागत म्हणून तेथे स्वच्छता मोहिम राबवण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी गडाच्या पायत्यासी असलेल्या गावातील व वाड्यावस्त्यातील ट्रेकर्स व काही शिवप्रेमी युवक एकत्रीत आले आहेत. यंदाही ती मोहिमे अधिक सक्षमपणे राबवून सरत्या वर्षाला निरोप व येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यास पन्नाहून जास्त युवकांनी तेथे श्रमदान केले.

सकाळी आठला सुरू झालेली स्वच्छता मोहिम दुपारी चार वाजेपर्यंत चालली. त्यांनी गडाच्या पायथ्यापासून टोकापर्यंतच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे स्वच्छता केली आहे. तेथे नित्य नमियमाने स्वच्छतेचे काम सुरू व्हावे, यासाठी युवकांचा आग्रह आहे. स्थानिक नागरीकांच्या मदतीने गडाच्या पहिल्या टप्प्यातील स्वच्छता करण्यात आली. त्यात पायऱ्यावर वाढलेली झाडी, तेथी शेवाळ यासह काटेरी झुडप हटवण्यात आली. बुरूज व त्या परिसरातही स्वच्छता करम्यात आली. गड मोठा आहे, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम राबवण्याचा संकल्प युवकांनीकेला आहे. येत्या नविन वर्षात तो संकल्प सिद्धीस नेण्यात येमार आहे. त्य़ासाठी काम करणाऱ्य़ांनी यात, सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...