agriculture news in marathi, thileriosis and babesiosis diseases in livestock | Agrowon

थायलेरियोसीस, बबेसियोसीस रोगाकडे दुर्लक्ष नको  
के. एल. जगताप, डॉ. एन. के. भुते
मंगळवार, 3 एप्रिल 2018

गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार करतात. निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संपर्क, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे रोगांचा प्रसार वाढतो. रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
 

गोचीडासारखे बाह्य परजीवी जनावरांच्या शरीराचा चावा घेतात. गोठ्याच्या सभोवतालच्या वातावरणात बाह्य परजीवींची असंख्य अंडी असतात. बऱ्याचदा बाह्य परजीवींमुळे उद्‌भवणाऱ्या रोगांमुळे जनावरांचा मृत्यूसुद्धा होतो.

थायलेरियोसीस

गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार करतात. निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संपर्क, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे रोगांचा प्रसार वाढतो. रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
 

गोचीडासारखे बाह्य परजीवी जनावरांच्या शरीराचा चावा घेतात. गोठ्याच्या सभोवतालच्या वातावरणात बाह्य परजीवींची असंख्य अंडी असतात. बऱ्याचदा बाह्य परजीवींमुळे उद्‌भवणाऱ्या रोगांमुळे जनावरांचा मृत्यूसुद्धा होतो.

थायलेरियोसीस

 • थायलेरिया अन्युलेटा या जंतुमुळे हा आजार होतो. हे जंतू लिंफ ग्रंथीमध्ये वाढतात. ग्रंथीचा आकार वाढून त्या सुजतात. जनावरांना १०४ ते १०६ अंश फॅरनहाईटपर्यंत ताप येतो.
 • या आजाराचे जंतू रक्तातील तांबड्या पेशीवर वाढतात. कालांतराने पेशींचा नाश होतो अाणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
 • आजाराचे तीव्रतेनुसार अति तीव्र, तीव्र अाणि जुनाट आजार असे तीन प्रकार पडतात.
 • अति तीव्र आजारामध्ये रक्तातील तांबड्या पेशी झपाट्याने मरतात. जनावरे १-४ दिवसांत मरण पावतात. औषधोपचाराला प्रतिसाद देत नाहीत.
 • तीव्र आजारामध्ये जनावराला ताप येतो. लिंफ ग्रंथी सुजतात. उपचार केल्यास ५० टक्के जनावरे बरी होतात.
 • जुनाट आजारामध्ये तापाचे प्रमाण जास्त असते. योग्य वेळी योग्य उपचार केल्यास ९० टक्के जनावरे बरी होतात.

बबेसियोसीस

 • बाबेसिया बायजेमिया या जंतुमुळे हा आजार होतो.
 • या अाजाराचे जंतू तांबड्या पेशीवर वाढून पेशींचा नाश करतात.
 • जनावराला १०५ ते १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत तीव्र ताप येतो.
 • लघवी लाल होते अाणि जनावरे अचानकपणे मरतात.
 • जनावराच्या पाठीमागील पायातील ताकद कमी होते. कावीळची लक्षणे दिसून येतात.
 • गाभण जनावरे गाभडतात. मेंदूवर आघात होऊन झटके येतात. पशुवैद्यकांकडून वेळीच उपचार करून घेणे अावश्‍यक असते.

संपर्क ः के. एल. जगताप, ९८८१५३४१४७
(कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड) 

टॅग्स

इतर कृषिपूरक
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....