agriculture news in marathi, thirteen thousand well in Pench distribution area | Agrowon

‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३ हजार सिंचन विहिरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनावर परिणाम झाला आहे. त्याची दखल घेत प्रथमच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी १३ हजार सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनावर परिणाम झाला आहे. त्याची दखल घेत प्रथमच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी १३ हजार सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

विभागातील पेंच लाभक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरींचा सर्वाधिक लाभ होणार असून विभागातील गोंदिया, गडचिरोली, आणि वर्धा जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

विभागात घेण्यात आलेल्या १३ हजार सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १० हजार तर दुसऱ्या टप्प्यात तीन हजार विहिरी पूर्ण करण्यात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यात पेंच लाभक्षेत्रासाठी ४ हजार ५०० तर इतर शेतकऱ्यांसाठी ५०० विहिरी बांधण्यात येणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील पेंच लाभक्षेत्रातील ८०० व इतर क्षेत्रातील ७०० अशा दीड हजार विहिरींचा लक्षांक असून सर्व धडक सिंचन विहिरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून मंजूर करण्यात येणार आहेत. 

विहीर मंजूर करताना लाभक्षेत्रातील पाच एकरांपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. पाच ते दहा एकर शेती असणाऱ्यांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे २ लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. वेस्टर्न कोल्डफिल्डच्या खाणीमधून वाहून जाणारे पाणी पेंच प्रकल्पामध्ये जमा करण्याच्या दृष्टीने बाराशे कोटी रुपयांचा आराखडा राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी आढावा बैठकीत दिली.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...