चार जिल्ह्यांतील सव्वाचार लाख लोकांची तहान टॅंकरवर

चार जिल्ह्यांतील सव्वाचार लाख लोकांची तहान टॅंकरवर
चार जिल्ह्यांतील सव्वाचार लाख लोकांची तहान टॅंकरवर

औरंगाबाद : अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात ऑक्‍टोबरमध्येच पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत. औरंगाबाद, जालना, बीड व नांदेड या चार जिल्ह्यांतील १७८ गाव वाड्यांमधील ४ लाख २६ हजार ५३३ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी १९८ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मराठवाड्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र करण्यास पावसाने दिलेला दगा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे गत आठवड्यात १७१ गाव वाड्यांत जाणवत असलेली टंचाई आता १७८ गाव वाड्यांपर्यंत पोचली आहे. टॅंकर व विहिरीद्वारे पाणीपुरवठ्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड या पाचही जिल्ह्यांत २३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात यंदा दुष्काळाचे संकट गडद होत चालले आहे.

पावसातील प्रदीर्घ खंड व रुसलेला परतीचा पाऊस यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद व परभरणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. पंधरवड्यापूर्वी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, परतूर आदी तालुक्‍यांतील १४२ गावे व ३ वाड्यांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत होती. त्यासाठी १५५ टॅंकरची सोय करण्यात आली होती.

शिवाय औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत जवळपास १६५ विहिरींचे टॅंकरसह थेट पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहणही करण्यात आले होते. २४ सप्टेंबरअखेर औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांच्या संख्येत २२ ची भर पडून ती संख्या १६४ गाव-वाड्यांवर पोचली होती. टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या वाढल्याने गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या १५५ टॅंकरची संख्याही २१ ने वाढून १७६ वर पोचली होती. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील १५३ गावे, जालना २२, नांदेड २, बीड १ अशा १७५ गावांसाठी १९८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्हा गाव-वाड्या टॅंकर
औरंगाबाद १५३ १६०
जालना २० ३५
नांदेड
बीड
विहिरींचे जिल्हानिहाय अधिग्रहण
औरंगाबाद १०१
जालना ५३
नांदेड ०२
बीड २५
उस्मानाबाद ५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com