agriculture news in marathi, Thirty-two lakh people thirsty in the tanker in Aurangabad | Agrowon

औरंगाबादमध्ये टॅंकरवर २ लाख ९१ हजार लोकांची तहान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील १७६ गावांतील २ लाख ९१ हजार ५९९ लोकांची तहान टॅंकरवर असून, त्यांना २०४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील १७६ गावांतील २ लाख ९१ हजार ५९९ लोकांची तहान टॅंकरवर असून, त्यांना २०४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यात टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. गंगापूर तालुक्‍यात ७६ गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यापाठोपाठ पैठण तालुक्‍यातील ४२, वैजापूर ३७, सिल्लोड १४, फुलंब्री ४, औरंगाबाद ३ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या टंचाईग्रस्त गावातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी २०४ टॅंकरची सोय करण्यात आली आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यात ६, गंगापूर ७९, पैठण ४६, फुलंब्री ४, सिल्लोड २१, तर वैजापूर तालुक्‍यातील ४८ टॅंकरचा समावेश आहे. पाणीपुरवठा टॅंकरच्या ४१५ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यात १२, गंगापूर १६१, पैठण ९५, फुलंब्री ९, सिल्लोड ४२ तर वैजापूर तालुक्‍यातील ९६ खेपांचा समावेश आहे. प्रत्यक्षात ४११ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पैठण तालुक्‍यात ३ व फुलंब्री तालुक्‍यात एक मिळून चार खेपा २२ ऑक्‍टोबरअखेरच्या अहवालानुसार कमी झाल्या आहेत. ६७ गावात टॅंकरसाठी तर १२ टॅंकर व्यतिरिक्‍त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ८० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये गंगापूर तालुक्‍यातील ३२, फुलंब्री ८ तर वैजापूर तालुक्‍यातील ४० विहिरींचा समावेश आहे.

इतर बातम्या
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...