agriculture news in marathi, Three crore for tractor and power trailer in Kolhapur district | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रिलरसाठी तीन कोटी
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलरसाठी उपविभागातील प्रत्येक तालुक्‍याला निधी मिळाला असून प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना आता पूर्वसंमती पत्रे देऊन निधीचे वितरण होईल. इतर अवजारांसाठीही निधी आला आहे. त्याच्या वाटपाचीही कार्यवाही सुरू होणार आहे.
- डॉ. नंदकुमार कदम, उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज.

कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलरसाठी जिल्ह्याला निधी मिळाला आहे. बारा तालुक्‍यांसाठी तीन कोटींचा निधी आला आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्‍यांसाठी सर्वाधिक प्रत्येकी ३३ लाख मिळाले आहेत. उर्वरित तालुक्‍यांसाठी २० ते २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून एकूण मागणीच्या २० टक्के लाभार्थींना लाभ देता येणार आहे. 

प्रतीक्षा यादीतील सर्व लाभार्थींना लाभ देण्यासाठी अजूनही १२ ते १५ कोटींच्या निधीची गरज भासणार आहे. कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी सरकारने समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत शेती अवजारांसाठी अनुदान देण्याची संकल्पना सुरू केली. लकी ड्रॉ पद्धतीने योजनेचे लाभार्थी निश्‍चित केले जातात. पहिल्या वर्षी मुबलक निधी मिळाल्याने योजनेला चांगला प्रतिसादही मिळाला. दुसऱ्या वर्षी ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलर वगळून इतर यंत्रांना निधी मिळाला. ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलर लाभार्थींची प्रतीक्षा यादी जैसे थे राहिली. 

मध्यंतरी केवळ अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी निधी आला. तोही अगदीच तोकडा आल्याने दोन ते तीन लाभार्थींनाच त्याचे वाटप झाले. गेले वर्षभर इतर लाभार्थींसाठी निधीच आला नव्हता.

निधीच नसल्याने ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रिलरसाठी पूर्वसंमती देण्याची प्रक्रियाही कृषी विभागाने थांबविली होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांचे डोळे निधी येण्याकडे लागले होते. चौकशी करून अखेर शेतकरी दमले; परंतु निधीचा मात्र पत्ता नव्हता. आता मार्च अखेर जवळ येऊ लागल्याने निधीचा ओघ सुरू झाला आहे. त्यातून कृषी यांत्रिकीकरणासाठीही जिल्ह्याला तीन कोटी मिळाले आहेत. हा निधी एकूण मागणीपैकी केवळ २० टक्केच आला आहे. गडहिंग्लज तालुक्‍याचे उदाहरण घेतले तर ट्रॅक्‍टर, पॉवर टिलरच्या लाभार्थी यादीत २१७ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 

इतर अवजारांसाठी १० लाख

मळणी मशीन, रोटा व्हेटर, राईस मिल, डाळ मिल आदी इतर अवजारांसाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्‍यांसाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी मिळाला आहे. 
यापूर्वी या अवजारांसाठी गडहिंग्लजला २९ लाख, आजऱ्याला १९ लाख, भुदरगडला २६ लाख, तर चंदगड तालुक्‍याला ३० लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीतून पूर्वसंमती दिलेल्या प्रतीक्षा यादीतील काही लाभार्थींना निधीचे वाटप केले आहे. उर्वरित निधीचेही पूर्वसंमती देऊन संबंधित लाभार्थींना वितरण होणार आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...