कर्जमाफीसाठी परभणीतून सव्वातीन लाख शेतकऱ्यांची नोंदणी
माणिक रासवे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शुक्रवार (ता.२२) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार २४५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आॅनलाइन अर्जासाठी मुदत वाढ दिल्यामुळे १८ हजार २४३ शेतकऱ्यांना नोंदणी करता आली, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शुक्रवार (ता.२२) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार २४५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आॅनलाइन अर्जासाठी मुदत वाढ दिल्यामुळे १८ हजार २४३ शेतकऱ्यांना नोंदणी करता आली, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी सुरवातीला देण्यात आलेल्या १५ सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीमध्ये जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली, तर १ लाख ७३ हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते; परंतु आॅनलाइन अर्ज भरू न शकलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शुक्रवार (ता.२२) पर्यंत ७ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली.

या वाढीव कालावधीत १८ हजार २४३ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.२२) अखेर कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ३४ हजार २४५ एवढी झाली आहे.

एकूण १ लाख ८० हजार ९४० शेतकरी कुटुंबांनी अर्ज भरले आहेत. यापैकी १ लाख ७७ हजार ५२६ शेतकऱ्यांनी अर्जासोबतच आधार कार्ड जोडलेले आहे. तसेच ३ हजार ४१४ शेतकऱ्यांनी आधार कार्डाविना अर्ज केले आहेत.

या अर्जांची तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समितीमार्फत छाननी केली जाणार आहे. आॅनलाइन यादीच्या प्रिंट काढून प्रत्येक गावात जाऊन चावडीवाचन केले जाणार आहे. यानंतर कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या स्पष्ट होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
पीकविमा योजनेत पारदर्शकता आणा : द्राक्ष...नाशिक : सदोष पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास...देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...