agriculture news in marathi, The three - in - match for the Solapur Bazar committee | Agrowon

सोलापूर बाजार समितीसाठी तिरंगी लढत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. १९) तब्बल ३१३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता बाजार समितीच्या १८ जागांसाठी ८१ अर्ज शिल्लक असून, त्यामध्ये ३५ अपक्षांचा समावेश आहे. या निवडणुकीत अनेक मातब्बरांना विजयासाठी ताण काढावा लागण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. १९) तब्बल ३१३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता बाजार समितीच्या १८ जागांसाठी ८१ अर्ज शिल्लक असून, त्यामध्ये ३५ अपक्षांचा समावेश आहे. या निवडणुकीत अनेक मातब्बरांना विजयासाठी ताण काढावा लागण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पक्षाचे नेते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरुद्ध शड्डू ठोकल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. भाजप व काँग्रेसवर नाराज झालेल्या इच्छुकांनी स्वतंत्र पॅनेल उभा करत शेतकरी संघटना, काही राजकीय पक्षांची मोट बांधली आहे.

शेतकऱ्यांना मतदान देण्याचा प्रथमच अधिकार असल्याने या निवडणुकीत नेत्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रचार करावा लागणार आहे. सहकारमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेसच्या अस्मितेच्या या निवडणुकीत नेमके कोणाला बहुमत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री देशमुख काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्याने या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.  जवळपास १ लाख १८ हजार ८९९ इतके मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

श्री सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडी
जितेंद्र साठे (कळमण), प्रकाश चोरेकर (नान्नज), प्रकाश वानकर (पाकणी), नामदेव गवळी (मार्डी), राजकुमार वाघमारे (बोरामणी), विजया भोसले (बाळे), दिलीप माने (हिरज), विजयकुमार देशमुख (कुंभारी), श्रीशैल नरोळे (मुस्ती), मलकप्पा कोडले (होटगी), अमर पाटील (कणबस), इंदुमती अलगोंड पाटील (मंद्रूप), सुरेश हसापुरे (कंदलगाव), वसंत पाटील (भंडारकवठे), बाळासाहेब शेळके (औराद).

श्री सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेल
संग्राम पाटील (कळमण), इंद्रजित पवार (नान्नज), सुनील गुंड (पाकणी), राजेंद्र गिरे (मार्डी), विश्रांत गायकवाड (बोरामणी), मेनका राठोड (बाळे), श्रीमंत बंडगर (हिरज), शिरीष पाटील (कुंभारी), सिद्धाराम हेले (मुस्ती), रामप्पा चिवडशेट्टी (होटगी), पंडित बोरुटे (कणबस), सुनंदा ख्याडे (मंद्रूप), अप्पासाहेब पाटील (कंदलगाव), शिवशरण बिराजदार-पाटील (भंडारकवठे), संगप्पा केरके (औराद).

अपक्ष
शहाजी मते (कळमण), जावेद पटेल (नान्नज), प्रकाश गावडे (मार्डी), अमृत बनसोडे, गणेश कांबळे, प्रमोद गायकवाड, मिलिंद मोरे, रवींद्र जाधव, नागनाथ शिंदे (बोरामणी), शांता भंवर (बाळे), विश्‍वनाथ शेगावकर, मळसिद्ध गुंडे, विजय हत्तुरे, सिद्धाराम चाकोते, सिद्धाराम भोरगुड्डे (कुंभारी), सिद्रामप्पा मलकप्पा पाटील (मुस्ती), हणमंत दिंडुरे, सिद्राम बोळीगर, अस्लम शेख (होटगी), शिवराया बिराजदार, शिवानंद चिट्टे, तमण्णा घोडके, हरीष पाटील, शिवयोगप्पा बिराजदार (कणबस), विजयालक्ष्मी बिराजदार, शालन चव्हाण, राजाबाई पुजारी (मंद्रूप), मायप्पा व्हनमाने, शिवानंद झळके (कंदलगाव), रमेश हसापुरे, बसवराज बगाडे (भंडारकवठे), सुरेश मळेवाडी, विजय गायकवाड, नागय्या स्वामी, श्रीशैल वाले (औराद).

 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...