agriculture news in marathi, three mp will expect ministry, akola, maharashtra | Agrowon

वऱ्हाडाला केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

अकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला भरघोस पाठिंबा दिला. अकोला, बुलडाणा, वाशीम-यवतमाळ या मतदारसंघांतील युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या, तर संजय धोत्रे यांनी विजयाचा चौकार लगावला. प्रतापराव जाधव यांनीही हॅटट्रिक केली. या तीन खासदारांपैकी एकाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. 

अकोला : या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला भरघोस पाठिंबा दिला. अकोला, बुलडाणा, वाशीम-यवतमाळ या मतदारसंघांतील युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या, तर संजय धोत्रे यांनी विजयाचा चौकार लगावला. प्रतापराव जाधव यांनीही हॅटट्रिक केली. या तीन खासदारांपैकी एकाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे. 

मागील केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भातील नितीन गडकरी व हंसराज अहिर यांचा समावेश होता. या वेळी अहिर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विदर्भाला मिळणारे दुसरे मंत्रिपद आता वऱ्हाडातील असू शकते. या ठिकाणी तीनही जिल्ह्यांतील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला मोठे मताधिक्य दिल्याने साहजिक आता पक्षाला पण विचार करावा लागणार आहे.प्रामुख्याने वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची दावेदारी वाढली आहे. अमरावतीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पराभूत झाल्याने आता मोठी जबाबदारी गवळी यांच्या खांद्यावर पडू शकते. 

दुसरीकडे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हेसुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याने आता धोत्रे यांना किमान राज्यमंत्रिपद मिळेल अशी शक्यता वाढली आहे. भाजपचे एक वरिष्ठ खासदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहले जाते. त्यांच्या समर्थकांमध्ये मंत्रिपदाबाबत चर्चांना सुरवातही झाली आहे. मंत्रिपद मिळाले नाही तर मोठी जबाबदारी नक्कीच पडेल असेही बोलले जात आहे.

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हेसुद्धा तिसऱ्यांदा निवडून आल्याने शिवसेनेच्या कोट्यातून महत्त्वाच्या पदासाठी ते पात्र मानले जाऊ लागले आहेत. यापूर्वी ते राज्यात मंत्री होते. मात्र वऱ्हाडात भावना गवळी यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले तर जाधव यांना थांबावे लागू शकते. सद्यःस्थितीत या तीनपैकी एक खासदार नक्की केंद्रात मंत्री होईल, अशी चर्चा युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. येत्या आठवड्यात याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल.

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...