agriculture news in Marathi, Three teams for inquiry of fraud agriculture university, Maharashtra | Agrowon

बोगस कृषी विद्यापीठाच्या चौकशीसाठी चार पथके
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे : सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आलेल्या बोगस कृषी विद्यापीठाची चौकशी करण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर फौजदारी गुन्हा केला जाणार आहे. 

पुणे : सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आलेल्या बोगस कृषी विद्यापीठाची चौकशी करण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर फौजदारी गुन्हा केला जाणार आहे. 

‘‘सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ या नावाने बोगस विद्यापीठ चालविले जात असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वीच कळली होती. त्यामुळेच पाच फेब्रुवारी २०१८ रोजी आम्ही राज्यातील विद्यार्थ्यांना या विद्यापीठाच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश न घेण्याची सूचना काढली होती,’’ अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिली. 

सोलापूरच्या अक्कलकोट भागातील तडवलरोडवर विद्यापीठ असल्याचे सांगितले जात आहे. या बोगस कृषी विद्यापीठाकडून राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ३६, अकोला विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तीन, परभणी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३, तर दापोली कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एक कृषी विद्यालय चालविले जाते. अधिकृत विद्यापीठे याबाबत गप्प का बसली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 
‘‘बोगस कृषी विद्यालये बेधडकपणे चालविली जात असताना कोणतीही तक्रार आलेली नव्हती. मात्र कृषी खात्याच्या कृषिसेवक परीक्षेत बोगस विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने परीक्षा दिली. या विद्यार्थ्याची निवड झाल्यामुळे कृषी खात्याने पडताळणीसाठी प्रमाणपत्र कृषी परिषदेला पाठविले. त्यामुळे आम्ही आता सर्व कृषी विद्यापीठांना या बोगस विद्यालयांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,’’ असे परिषदेचे म्हणणे आहे. 

‘‘राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा बोगस कुलगुरू कोण आहे तसेच या विद्यापीठाचे अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख तसेच विद्यालयाचे प्राचार्य कोण आहेत. मुळात विद्यापीठाच्या इमारती आहेत, की फक्त कागदोपत्री प्रमाणपत्रे वाटली जात आहेत, याची कोणतीही माहिती सध्या नाही. मात्र चार विद्यापीठांची चार पथके याबाबत सर्व माहिती पुढील दोन आठवड्यांत सादर करतील,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

चौकशीचे अहवाल आल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूसहीत प्राचार्यांवर देखील फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण अनधिकृत संस्था स्थापन करणे आणि अनधिकृत अभ्यासक्रम सुरू करणे प्रतिबंधक कायदा २०१३ नुसार संबंधित विद्यापीठावर कारवाई करण्याचे अधिकार कृषी परिषदेच्या शिक्षण संचालकांना आहेत. 

‘‘बोगस कृषी विद्यापीठाचा कोणताही कर्मचारी अद्याप परिषदेकडे आलेला नाही. मात्र चौकशी अहवालानंतर अंतिम कारवाईपूर्वी विद्यापीठाला म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर परिषदेकडून कारवाई केली जाईल. या कारवाईविरोधात मंत्रालयातील उपसचिवांकडे अपील करण्याची तरतूद कायद्यातच आहे,’’ असेही परिषदेचे म्हणणे आहे.

सहा जिल्ह्यांत पाळेमुळे 
महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या प्राथमिक माहितीनुसार सोलापूरच्या बोगस कृषी विद्यापीठाकडून सहा जिल्ह्यांत ६३ विद्यालये चालविली जात आहेत. या विद्यापीठांकडून चालविणाऱ्या अनधिकृत कृषी अभ्यासक्रमांच्या संस्था अशा ः सोलापूर- मागासवर्गीय खुले कृषी विद्यालये, सिद्धेश्वर प्रसात बहुउद्देशीय सेवा संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रयत वतन रेजिमेंट, तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी महाविद्यालय माहिती व तंत्रज्ञान या नावाने पुणे, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली व नाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये कृषी विद्यालये आहेत. अधिकृत विद्यापीठांची पथके सदर बोगस विद्यापीठाच्या संस्थांची प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन चौकशी करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...