agriculture news in marathi, Till the end of March till the end of the work in the scarcity plan | Agrowon

टंचाई आराखड्यातील कामे मार्चअखेरपर्यंत करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

जिल्ह्यात सध्या ५५ टॅंकर सुरू असून, तीन महिन्यांत टॅंकरची मागणी आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. टंचाईअंतर्गत २०० नवी कामे पूर्ण झाली आहेत. आठशे कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सहाशे कामे निविदा स्तरावर आहेत.  
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

पुणे : दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखड्यांतर्गत आठशे कामांना प्रशासकीय मान्यता दिली. सहाशे कामे निविदा स्तरावर आहेत. जिल्ह्यात टंचाई आराखड्याअंतर्गत करण्यात येणारी कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला. 

जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या कामांबाबत जिल्हा परिषदेच्या तालुका स्तरावरील अधीक्षक अभियंत्यांची बैठक झाली. या बैठकीत हे आदेश दिले. राज्य सरकारने सुरवातीला जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच तालुक्यांतील १९ महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला. मावळ तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे.

महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन टंचाई आराखडा तयार केला आहे. टंचाई आराखड्याअंतर्गत जिल्ह्यात विविध प्रकारची दोन हजार ७१८ कामे सुचविण्यात आली आहेत.

 

इतर बातम्या
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...