agriculture news in Marathi, time extended for voting, Maharashtra | Agrowon

मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मुदत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी या वेळी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत दिली जाणार अाहे. मतदानासाठी पहिल्यांदाच नेहमीपेक्षा एक तासाने ही वेळ अधिक ठेवण्यात अाली अाहे. निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी सोमवारी (ता. १८) सायंकाळी अायोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत सांगितले. 

अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी या वेळी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत दिली जाणार अाहे. मतदानासाठी पहिल्यांदाच नेहमीपेक्षा एक तासाने ही वेळ अधिक ठेवण्यात अाली अाहे. निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी सोमवारी (ता. १८) सायंकाळी अायोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत सांगितले. 

ते म्हणाले,भारत निवडणूक आयोगाने १० मार्चला आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तत्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाने निवडणूक पूर्व तयारी केलेली अाहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर तयारी केली जात अाहे. पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाळ, नायब तहसीलदार निवडणूक सतीश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंगळवार (ता. १९) पासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरवात होत अाहे. मंगळवार (ता. २६) पर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार अाहे. शुक्रवारी (ता. २९) मागे घेता येईल. त्यानंतर १९ एप्रिलला या मतदारसंघात मतदान होणार अाहे. अकोला महानगरातील अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोचविण्यासाठी अाॅटोरिक्षा संघटनेने विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेसाठी नऊ हजार १०४ अधिकारी, कर्मचारी नेमण्यात अाले अाहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व), मूर्तिजापूर अाणि रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात. या लोकसभा निवडणुकीसाठी सध्यापर्यंत १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार असून यात ९ लाख ६२ हजार ५७६ पुरुष अाणि ८ लाख ९२ हजार १५९ महिला मतदार अाहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात अाली अाहे. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे माहिती देत मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचेही अावाहन केले.

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...