agriculture news in Marathi, Time on farmers to cut orchards | Agrowon

फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

जवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे वेदनादायी बनले आहे. आटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचे गंभीर प्रश्‍न उभे राहिले. पाण्यामुळे अंबाजोगाई तालुक्‍यातील जवळगाव येथील भागवतराव हारे यांनी अडीच एकरांतील नऊ वर्षे वयाची अंजीर बाग तोडून टाकली आहे. 

जवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे वेदनादायी बनले आहे. आटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचे गंभीर प्रश्‍न उभे राहिले. पाण्यामुळे अंबाजोगाई तालुक्‍यातील जवळगाव येथील भागवतराव हारे यांनी अडीच एकरांतील नऊ वर्षे वयाची अंजीर बाग तोडून टाकली आहे. 

भागवतराव हारे यांची जवळगाव शिवारात अडीच एकरांत अंजीर बाग होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी बाग उभी केली. मध्यंतरी या बागेने चांगले उत्पादनही दिले; परंतु गेल्या तीन-चार वर्षांत या भागात पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली. आधी विहीर आटली. त्यानंतर बोअरवेलही कोरडे पडले. बागेला द्यायलाही त्यांच्याकडे पाणी नव्हते. अखेरीस त्यांनी जड अंतःकरणाने ही बाग तोडण्याचा निर्णय घेतला.

गेल्या आठवड्यात हे झाड तोडण्याचे काम पूर्ण झाले. आज या शेतात अंजीर झाडांचे अवशेष तेवढे पडून आहेत. तीन महिन्यांपूर्वी हे शेत हिरवेगार होते; परंतु जसे पाणी आटले तशी बाग करपत होती. पाण्याची सोय न करता आल्याने अखेरीस हे कठोर पाऊल उचलले. या भागात दोन महिन्यांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरने तळ गाठला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला खरा; मात्र एकही उपाययोजना लागू झालेली नाही. 

जवळगाव परिसरात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. फळबागांना मोठा फटका बसतो आहे. पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. बोअरवेलला पाणी लागत नाही. बागा जगविण्यासाठी केलेला खर्चही निघणे झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यंदा फळबाग लागवडीवर परिणाम झाला आहेच; पण त्या बागा जगवण्याचेही मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. फळबागा जगवण्यासाठी आधार असलेला मुरंबी तलावही कोरडा आहे. जवळगाव परिसरातील शेतकरी फळबागा मोडत आहेत.-भागवत हारे, शेतकरी, जवळगाव
 

इतर बातम्या
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
स्टार्च शिजवण्यासह खाण्याचे पहिले...दक्षिण आफ्रिकेतील क्लासीज नदी परिसरातील...
पुणे विभागात तब्बल ९५७ टॅंकरव्दारे...पुणे  : उन्हाचा वाढलेला चटका, भूजलपातळीत...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...