agriculture news in marathi, The time to get the farmers to sell gram at the rate | Agrowon

मिळेल त्या दरात हरभरा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

जळगाव ः जिल्ह्यात २९ मे रोजी शासकीय हरभरा खरेदीनंतर खासगी बाजार व बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर व्यापारी लॉबीने आणखी पाडले असून, शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात हरभरा विक्री करावी लागत आहे. ऐन खरीप हंगामाच्या काळात ही समस्या असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

जळगाव ः जिल्ह्यात २९ मे रोजी शासकीय हरभरा खरेदीनंतर खासगी बाजार व बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर व्यापारी लॉबीने आणखी पाडले असून, शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात हरभरा विक्री करावी लागत आहे. ऐन खरीप हंगामाच्या काळात ही समस्या असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात हरभरा विक्रीबाबत नोंदणी केली होती, त्या सुमारे ३० ते ३२ हजार शेतकऱ्यांच्या ५२ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी मार्केटिंग फेडरेशनने केलेली नाही. खरेदी केंद्रांमध्ये अनेक शेतकऱ्यांचा हरभरा २९ मे नंतर पडून आहे. शेतकऱ्यांनी मध्यंतरी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले; परंतु त्याची दखल घेतली नाही. ही दखल घेऊन तातडीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मगाणी शेतकरी करीत आहेत.

शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर व्यापारी मंडळी कमी दरात खरेदी करीत असून, पैसे १० ते १२ दिवसांनंतर देण्याच्या बतावण्या करीत आहेत; परंतु सध्या हंगामाचे दिवस असल्याने बियाणे, मशागती, उधारउसनवारी या बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात हरभरा विक्रीशिवाय पर्याय नाही. बाजारात दर ३३०० रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. काबुली हरभऱ्याचे दरही ५२०० रुपयांपर्यंतच आहेत. जळगाव, रावेर, मुक्ताईनगर बाजार समितीत मंदी असल्याचे सांगितले जात आहे.

अमळनेर, जामनेरमधील नेरी बाजारात लागलीच लिलाव केले जातात; परंतु दर अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावल, चोपडामधील काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने आपला हरभरा इंदूर, बऱ्हाणूरच्या बाजारात विक्रीसाठी पाठविला; परंतु तेथेही अपेक्षित दर नाहीत. पैसे लागलीच रोकडच्या स्वरूपात तेथे मिळाल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...