भीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा

भीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा
भीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा

मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी''ची १६ कोटी ५७ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे शासनाकडून कारखान्यावर होणारी ‘आरआरसी''ची कारवाई टळली आहे. दरम्यान, कारखाना सुरू होण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक आणि कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.

गेल्या गळीत हंगामात फेब्रुवारी व मार्चमध्ये गळितास आलेल्या उसाची एफआरपीची रक्कम कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केली नव्हती. विविध शेतकरी संघटनांनी याबाबत आवाज उठविला होता, तर शेतकरी आंदोलनेही झाली होती. मात्र राज्यातील सर्वच कारखाने अडचणीत असल्याचे कारखान्यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भीमा कारखाना व सभासदांचे हित जोपासण्यासाठी कारखान्यावरील ‘आरआरसी''च्या कारवाईला स्थगिती दिली होती, मात्र ती अनेकांना रुचली नव्हती.

गेल्या दोन दिवसांपासून कारखान्याने ‘एफआरपी'ची १६ कोटी ५७ लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली. तशा आशयाचे लेखी पत्र जिल्हाधिकारी, साखर आयुक्त व अन्य विभागांना दिल्याचे या वेळी सांगण्यात आले. कारखाना प्रशासनाकडून ‘हुमणी''बाधित क्षेत्राचा सर्व्हे सुरू आहे. शासनाच्या कृषी विभागाचाही सर्व्हे सुरू आहे. त्यांचा अहवाल हाती येताच कारखान्याच्या संचालक मंडळाची लवकरच बैठक होणार आहे. जे धोरण ठरेल त्याप्रमाणे पुढील नियोजन करण्यात येणार आहे. मात्र, त्यात सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com