agriculture news in marathi, Tisangi Sonake lake Movement to leave the water | Agrowon

तिसंगी सोनके तलावात पाणी सोडण्यासाठी आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

तिसंगी, जि. सोलापूर : नीरा-भाटघर धरणाचे पाणी तिसंगी-सोनके तलावात सोडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या गेटवर शासनाचा निषेध करीत पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पण प्रशासकीय यंत्रणा अद्यापही हललेली नाही. आंदोलनकर्त्या तिघांपैकी दोघा आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही ते आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, सांगोल्याचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतः आंदोलनाला भेट देऊन तिथेच बसण्याचा इशारा दिला आहे.

तिसंगी, जि. सोलापूर : नीरा-भाटघर धरणाचे पाणी तिसंगी-सोनके तलावात सोडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या गेटवर शासनाचा निषेध करीत पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पण प्रशासकीय यंत्रणा अद्यापही हललेली नाही. आंदोलनकर्त्या तिघांपैकी दोघा आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही ते आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, सांगोल्याचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतः आंदोलनाला भेट देऊन तिथेच बसण्याचा इशारा दिला आहे.

पावसाळी हंगामात यंदा नीरा-भाटघर धरण १०० टक्के भरल्यानंतर धरणातील अतिरिक्त पाणी या धरणाखालील तलावात सोडणे अपेक्षित होते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाव भरून न घेता हे पाणी भीमा नदीत सोडून दिले. पंढरपूर तालुक्‍यातील तिसंगी सोनके हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. नीरा-भटघरच्या पाणीवाटपात या तलावातील पाण्याचा प्रामुख्याने समावेश असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन काळजीपूर्वक केले नाही. या तलावातील पाण्यावर केवळ शेती नाहीतर ११ गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

तलावात पाणी सोडावे, यासाठी आमदार भारत भालके यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिले, मात्र पाणी सोडले नाही. या भागातील लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने पाणी सोडण्याची गरज असून अन्यथा शेतकऱ्यांनाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. प्रशासनाने अद्यापही काहीच हालचाल न केल्याने आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. त्यातच संजय कारंडे, अशोक पवार, विजय पवार या आंदोलकांची तब्येत खालावली आहे.

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...