बारावीचा आज निकाल

बारावीचा आज निकाल
बारावीचा आज निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार, ता. ३०) दुपारी एक वाजता आॅनलाइन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. मंडळाद्वारे २१ फेब्रुवारी आणि २० मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावी परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.maharashtra.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने दुपारी १ वाजल्यानंतर पाहता येणार आहे. तर गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात येईल. असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. असा पाहा निकाल ः

  •  mahresult.nic.in वर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल किंवा महाराष्ट्र एचएससी निकाल २०१८
  • त्यानंतर परीक्षा बैठक क्रमांक (सीट नंबर) आणि इतर आवश्यक माहिती भरावी.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर निकालाची प्रिंटही काढता येऊ शकते.
  • 'एसएमएस'नेही समजणार निकाल
  • बारावीचा निकाल एसएमएसच्या माध्यमातून मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना MHHSC<space>SEAT NO त्यानंतर ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल समजू शकणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com