‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल व्यवस्थापनाचा जागर

‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल व्यवस्थापनाचा जागर
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल व्यवस्थापनाचा जागर

पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या ‘सकाळ- ॲग्रोवन’चा आज (ता. २०) चौदावा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने शेतीतील जल व्यवस्थापनावर आधारित तीन विशेषांकांचा नजराणा आजपासून वाचकांना मिळणार आहे.  शेतकऱ्यांना प्रगतीच्या वाटा दाखविणारा ‘ॲग्रोवन’ आज (ता. २०) १५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २०१८ हे वर्ष ‘ॲग्रोवन’ने जमीन सुपीकतेच्या जागृतीला अर्पण करत भूमातेच्या संवर्धनासाठी राज्यभर मंथन घडवून आणले होते. यंदाच्या वर्षी शेतीमधील दुर्लक्षित अशा ‘जल व्यवस्थापन’ विषयाला राज्याच्या कृषी अजेंड्यावर आणण्याचा संकल्प केला आहे.  ‘जल व्यवस्थापन : धोरणे आणि वास्तव’ या विषयाला ॲग्रोवनचा आजचा (ता. २०) विशेषांक वाहिलेला आहे. नैसर्गिक अरिष्टांबरोबर धोरणांचा अभावदेखील जल व्यवस्थापनावर पिछाडीवर नेत आहे काय, या मुद्द्यावर राज्यातील जलतज्ज्ञ व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभवसंपन्न लेख आजच्या विशेषांकात देण्यात आले आहेत. मराठवाडयाचं इस्राईल अशी ओळख मिळालेल्या कडवंची गावाची विस्तृत माहिती शेतकऱ्यांना उद्याच्या (ता. २१) विशेषांकात मिळणार आहे. आदर्श जल व्यवस्थापनामुळे या गावाने राज्याचे लक्ष कसे वेधून घेतले याचा सांगोपांग आढावा घेणारा हा विशेषांक असेल. महाराष्ट्रातील जलबहाद्दर शेतकऱ्यांची दखल जल व्यवस्थापनाच्या निमित्ताने अॅग्रोवन घेणार आहे. या जलबहाद्दरांनी विकसित केलेल्या विविध मॉडेल्सची माहिती सोमवारच्या (ता. २२) विशेषांकात दिली जाणार आहे. यामुळे आजपासून तीन दिवस १६ पानी विशेषांकासह नियमित १६ पानी ॲग्रोवन राज्यभरात शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहे.   मराठवाडयाचं इस्राईल अशी ओळख मिळालेल्या कडवंची गावाची विस्तृत माहिती शेतकऱ्यांना उद्याच्या (ता. २१) विशेषांकात मिळणार आहे. आदर्श जल व्यवस्थापनामुळे या गावाने राज्याचे लक्ष कसे वेधून घेतले याचा सांगोपांग आढावा घेणारा हा विशेषांक असेल. महाराष्ट्रातील जलबहाद्दर शेतकऱ्यांची दखल जल व्यवस्थापनाच्या निमित्ताने अॅग्रोवन घेणार आहे. या जलबहाद्दरांनी विकसित केलेल्या विविध मॉडेल्सची माहिती सोमवारच्या (ता. २२) विशेषांकात दिली जाणार आहे. यामुळे आजपासून तीन दिवस १६ पानी विशेषांकासह नियमित १६ पानी ॲग्रोवन राज्यभरात शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहे. चर्चासत्रांचे आयोजन शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना थेट बांधावर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘ॲग्रोवन’च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार (ता. २०) आणि रविवारी (ता. २१) नांदेड, अमरावती, हिंगोली जिल्ह्यांत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘शिवा ग्लोबल ॲग्रो इंडस्ट्रीज’, नांदेड, आणि ‘हार्वेल आझूद’, ‘पॅटरॉन ऑरगॅनिक्स’ हे या चर्चासत्रांचे प्रायोजक आहेत. या चर्चासत्रांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ॲग्रोवन’च्या वतीने केले आहे. असे आहे नियोजन  दिनांक : शनिवार २० एप्रिल २०१९  वेळ : सकाळी ९ वाजता  विषय : ‘हळद व केळी पीक व्यवस्थापन’  वक्ते : प्रा. संदीप जायभाये (कृषी विद्यावेत्ता, केव्हीके, पोखर्णी), श्री. दीपक मालीवाल (एम.डी. शिवा ग्लोबल ॲग्रो इडंस्ट्रीज प्रा. लि.) श्री. अजय शर्मा (विपणन, मुख्य अधिकारी, शिवा ग्लोबल ॲग्रो इडंस्ट्रीज प्रा. लि.)  स्थळ : श्री हनुमान मंदिर, निवघा, ता. मुदखेड, जि. नांदेड.  दिनांक : शनिवार २० एप्रिल २०१९  वेळ : सकाळी ११.३० वाजता  विषय : संत्रा आंबिया बहर व्यवस्थापन  वक्ते : प्रवीण बेलखडे (प्रगतिशील शेतकरी व संत्रा पिकाचे अभ्यासक), डॉ. संजय देशमुख (कृषी तज्ज्ञ) ठिकाण : पत्रकार सहकारी पतसंस्था, खडकाडीपुरा शिरजगाव (क), ता. चांदुरबाजार, जि. अमरावती  दिनांक : रविवार २१ एप्रिल २०१९  वेळ : सकाळी ८.३० वाजता  विषय : ‘हळद लागवड पूर्वतयारी व पाणी व्यवस्थापन’   वक्ते : अनिल ओळंबे (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, केव्हीके, तोंडापूर), ब्रह्मा पवार (विभागीय व्यवस्थापक, हार्वेल आझूद)  स्थळ : गुरुपादेश्‍वर शिवाचार्य मठ संस्थान, गिरगाव, ता. वसमत, जि. हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com