agriculture news in marathi, Today the Constitution Rescue Rally in Mumbai | Agrowon

मुंबईत आज संविधान बचाव रॅली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई : देशात सध्याची परिस्थिती पाहता संविधान वाचविण्यासाठी प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) मुंबईत सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली काढली जाणार आहे. या आंदोलनात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, जनता दलाचे नेते शरद यादव, तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खासदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : देशात सध्याची परिस्थिती पाहता संविधान वाचविण्यासाठी प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) मुंबईत सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली काढली जाणार आहे. या आंदोलनात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, जनता दलाचे नेते शरद यादव, तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खासदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया, अशी ही सर्वपक्षीय रॅली निघणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे मूक धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे. या रॅलीत सर्वपक्षीय राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सहभाग असणार आहे. या संदर्भात माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी म्हणाले, भाजपकडून दररोज वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. देशातील सामाजिक सलोखा बिघडलेला असून, अनेक ठिकाणी जातीय दंगली घडविल्या जात आहेत. यामधूनच राजकीय पोळी भाजण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे राज्यघटनेवरील विश्वासाला कुठे तरी तडा चाललेला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील घटनादेखील ताजीच आहे. न्यायालयीन प्रक्रियेतदेखील राजकीय नेते हस्तक्षेप करीत असतील, तर हे गंभीर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नदेखील गंभीर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. शेतमालाचे दर पाडले जात आहेत. कोणत्याही पिकाला हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचादेखील प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे. त्यामुळे हे सर्व थांबविण्यासाठी सर्वपक्षीय अराजकीय संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे खासदार शेट्टी म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...