राज्यात आज अन्नत्याग आंदोलन

राज्यात आज अन्नत्याग आंदोलन
राज्यात आज अन्नत्याग आंदोलन

माळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून सोमवारी (ता. १९) राज्यभरात अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी किसान सभा सहभागी होणार आहे, असे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरआण्णा धोंडगे यांनी सांगितले. राज्यात ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपवास पाळला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी किसान सभा, शेतकरी जागर मंच महाराष्ट्र मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या कुटुंबासह सहभागी होणार आहेत. किसानपुत्र संघटनेचे अमर हबीब यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी किसान सभा अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहे असे  श्री. धोंडगे यांनी सांगितले. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. १९) अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, असे किसान सभेचे प्रदेश सहसचिव विलास बाबर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू सोळंके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com