agriculture news in marathi, today its Gosikhurd project anniversary | Agrowon

एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द प्रकल्पाचे भोग
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे प्रकाशाच्या वेगाने किंमत वाढलेल्या गोसेखुर्द प्रकल्पातून सिंचन क्षमता मात्र वाढू शकली नाही. परिणामी २२ एप्रिल रोजी ३१ वा वर्धापन दिन साजरा करणारा हा प्रकल्प केव्हा पूर्णत्वास जाणार आणि शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न केव्हा साकार होणार? हा प्रश्‍न आजही अनुत्तरीतच आहे. 

भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे प्रकाशाच्या वेगाने किंमत वाढलेल्या गोसेखुर्द प्रकल्पातून सिंचन क्षमता मात्र वाढू शकली नाही. परिणामी २२ एप्रिल रोजी ३१ वा वर्धापन दिन साजरा करणारा हा प्रकल्प केव्हा पूर्णत्वास जाणार आणि शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न केव्हा साकार होणार? हा प्रश्‍न आजही अनुत्तरीतच आहे. 

पूर्वच नाही तर, संपूर्ण विदर्भात सर्वात मोठा प्रकल्प अशी गोसेखुर्दची ओळख. १९८३ साली या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्या वेळी या प्रकल्पाची किंमत ३६२ कोटी रुपयांची होती. ३१ वर्षांनंतर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आता या प्रकल्पाची किंमत १८,४९८ कोटी रुपयांवर पोचली आहे. साधारणतः चार हजार ९०० पटीच्यावर किंमतीत वाढ झाली आहे. चार हजार पटीपेक्षा अधिक किंमतीत वाढ नोंदविणाऱ्या या प्रकल्पातून सिंचन मात्र त्या तुलनेत वाढू शकले नाही. आजही केवळ १५ ते २० टक्‍केच सिंचन या प्रकल्पातून शक्‍य होते.

प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. हा कालवा प्रकल्पासून लाखांदूरपर्यंत जातो. या कामाची लांबी २२.९३ किलोमीटर आहे तर, सिंचन क्षमता ४०.२०६ हेक्‍टर आहे. या कालव्याचे काम उच्च प्रतीचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधला जात आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून हे काम रेंगाळले आहे. या कालव्याची ४४१ कोटी रुपयांची अंदाजित किंत असली तरी हजारो कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगीतले जाते. वितरिकेचे कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे. 

शासकीय आकडेवारीनुसार उजव्या मुख्य कालव्याचे काम ९८ टक्‍के पूर्ण झाले असून शाखा कालवे मात्र ५० टक्‍केच पूर्ण झाले आहेत. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावर आधारित टेकेपार, आंभोरा, नेरला, मोखाबर्डी, उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, पावसाळ्या व्यतिरिक्‍त रबी हंगामासाठी अजूनही धरणातून पाणी सोडले जात नाही. 

राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा 
गोसेखुर्द प्रकल्पाला २००९ मध्ये राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाला. त्यामुळे केंद्र शासनाचा निधी प्राप्त होत असतानाही प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नाही. मुख्य धरणाचे काम १०० टक्‍के पूर्ण झाले असले तरी पाणी साठवण क्षमता अवघी ११४६ दलघमी आहे. तलांक २४२.५० मीटरपर्यंत पाणीसाठा करण्यात येत आहे. 

पुनर्वसनाचे कामही रेंगाळले
पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी या प्रकल्पाला न्याय दिला नाही. परंतु आजच्या घडीला सत्ताकेंद्र विदर्भात असतानाही प्रकल्पाची गती मंद आहे. प्रथम टप्प्यातील ११८ गावे, दुसऱ्या टप्प्यातील ४० पैकी १७ गावे, तिसऱ्या टप्प्यातील २७ पैकी ६ गावे स्थलांतरित झाले आहेत. एकूण ८५ गावठाणापैकी ४१ गावठाणे पूर्णपणे स्थलांतरित झालेली आहेत. ४४ गावाच्या पुनर्वसवन स्थलांतरणाचा प्रश्‍न अद्यापही कायम आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...