कर्नाटक विधानसभेचे मानकरी आज ठरणार

कर्नाटक विधानसभेचे मानकरी आज ठरणार
कर्नाटक विधानसभेचे मानकरी आज ठरणार

बंगळूर, कर्नाटक : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीच्या मतमोजणीस आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होत आहे. १२ मे रोजी ७० टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि जनता दल (से) यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तेवर पुन्हा दावा केला असून, भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनीही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर जनता दल (से) हा पक्ष राज्यात सत्तास्थापने ‘किंगमेकर’ची भूमिका बजावेल, असे संकेत मतपूर्व चाचण्यांत देण्यात आले आहेत.  साधारणत: मजमोजणी प्रारंभ होताच एक तासानंतर निकालांचा कल स्पष्ट होण्यास प्रारंभ होईल, तर सायंकाळी उशिरा सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने जर आपले बहुमत खेचून आणले अथवा सत्ता स्थापन केल्यास १९८५ पासून पहिल्यांदाच एकाच पक्षास कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेस संधी मिळणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेडगे यांनी दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीनंतर मागसवर्गीय नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना पुन्हा संधी दिली जाण्याच्या तर्क-वितर्कांनाही जोर सध्या अाला अाहे.    दुसरीकडे काँग्रेसला जागा कमी पडल्यास जनता दलाबरोबर युतीची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे पूर्वश्रमीचे जनता दलाचे असून त्यांनी काँग्रेस प्रवेशानंतर जोरदार मुसंडी मारत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले होते. सिद्धरमय्या यांच्या विरोधात भाजप आणि जनता दलाने चांगलीच आघाडी उघडली होती. अर्थात जनता दल (से.) हा देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागणार आहे. कुमारस्वामी ‘किंगमेकर’ नाही, तर ‘किंग’ होण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.  लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कर्नाटकच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि मी मुख्यमंत्री होईल, असा मला विश्‍वास आहे. दलित मुख्यमंत्री होण्यासही माझी कोणतीही आडकाठी नाही. मात्र, हायकमांड जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, याकरिता ते विजयी उमेदवारांची मते जाणून घेतील. - मुख्यमंत्री सिद्धरामय्या विधानसभेच्या सर्व जागांचे निकाल लागल्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू अशी प्रतिक्रिया जनता दल (से.)चे नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे. निवडणुका झाल्या असून सरकार स्थापनेबाबत कोणतीही घाईने भूमिका घेण्याची गरज नाही. - एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान, जनता दल (से) नेते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com