agriculture news in marathi, Today Kartiki Ekadashi celebration in Pandharpur | Agrowon

पंढरीत आज कार्तिकीचा सोहळा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सोलापूर :
लागोनिया पाया विनवितों तुम्हाला ।
करें टाळी बोला मुखें नाम ।।
विठ्ठल, विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुखसोहळा स्वर्गी नाही ।।

अशी भावना मनात ठेवून कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. सोमवारी (ता.३०) सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.

सोलापूर :
लागोनिया पाया विनवितों तुम्हाला ।
करें टाळी बोला मुखें नाम ।।
विठ्ठल, विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुखसोहळा स्वर्गी नाही ।।

अशी भावना मनात ठेवून कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. सोमवारी (ता.३०) सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दर्शन मंडपाचे सर्व मजले भरून चंद्रभागा घाटाच्याही पुढे गेली आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. ३१) कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा होत आहे, पहाटे अडीच वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा होणार आहे.

महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतूनही वारकरी एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांनी शहरात दाखल होऊ लागले आहेत. पंढरीतील मठ व धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीने भरू लागले आहेत. सोलापूर रस्त्यावरील ६५ एकर जागा, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गासह सर्वच रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलले आहेत.

या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने दरवर्षीपेक्षा यंदा कोकणासह, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू येथील वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. वारीसाठी होणारी ही गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. सोमवारी उशिरापर्यंत शहरात सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत.

यात्रेच्या निमित्ताने ६५ एकरांमध्ये तंबू व राहुट्या टाकण्यासाठी दिंडीकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. नगरपालिकेने ६५ एकरांसह वाळवंटात पिण्याचे पाणी, वीज आणि स्वच्छतागृहांची सोय केली आहे. यंदा चंद्रभागा नदीत मुबलक पाणी असल्यामुळे नदीवरही स्नानासाठी झुंबड उडाली आहे. त्यात सोमवारी दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने गर्दीत चांगलीच वाढ झाली आहे.

सोमवारी दुपारपासून गर्दीमध्ये आणखी वाढ झाली. दुपारनंतर पदस्पर्श दर्शनरांग चंद्रभागा घाटाच्यापुढे गेली होती. दर्शन मंडपातील सर्व मजले भरलेले असून, गर्दी वाढू लागली आहे. मंदिरात सध्या २४ तास दर्शन सुरू असल्यामुळे कमी वेळेत श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ मिळत आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....