agriculture news in marathi, Today kasaba Farmer's Organization organized a rally of bullocks today | Agrowon

कारहुणवीनिमित्त आज बैलजोड्यांची मिरवणूक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर : कसबा गणपती शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी (ता. २७) कारहुणवीनिमित्त बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच वेळी कृषिनिष्ठ जीवनगौरव पुरस्कारांचे वितरणही केले जाणार आहे, अशी माहिती केदार मेंगाणे यांनी दिली.

सोलापूर : कसबा गणपती शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी (ता. २७) कारहुणवीनिमित्त बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच वेळी कृषिनिष्ठ जीवनगौरव पुरस्कारांचे वितरणही केले जाणार आहे, अशी माहिती केदार मेंगाणे यांनी दिली.

बाळीवेस येथील श्री कसबा गणपती मंदिरात सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्‌घाटन आणि पुरस्कारांचे वितरण होईल. या वेळी श्री सिद्धेश्‍वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, सिद्धेश्‍वर देवस्थान पंच समितीचे विश्‍वस्त संजय थोबडे, मल्लिनाथ मसरे, सोमनाथ भोगडे, सुधीर थोबडे, नंदकुमार मुस्तारे व नगरसेवक आनंद चंदनशिवे उपस्थित राहणार आहेत.

कसबा गणपती मंदिर, टिळक चौक, होटगी स्वामी रस्तामार्गे निघणाऱ्या या मिरवणुकीची सांगाता कसबा गणपती मंदिर येथे होणार आहे.

या शेतकऱ्यांचा होणार गौरव :
यंदा आनंद मेंगाणे आणि सिद्धेश्‍वर जोकारे (सोलापूर), लोकेश विभुते (दर्शनाळ, ता. अक्कलकोट) यांना कृषिनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच श्री बृहन्मठ होटगी संस्थेतर्फे कृषी जीवनगौरव पुरस्कार देऊन राजशेखर गुंगे (देगाव) यांना गौरविण्यात येणार आहे. नामदेव दुधभाते आणि कोंडाजी चौधरी यांचा गुंगे परिवारातर्फे रोख बक्षीस देऊन सन्मान होणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...