लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदान
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदान

लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदान

सोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार रविवारी (ता. २१) संपला. आता मंगळवारी (ता. २३) येथे मतदान होत आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे संजय शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही लढत प्रतिष्ठेची केल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूरचा काही भाग, तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो. सुमारे १८ लाख ७३९  इतके मतदार या मतदारसंघात आहेत. आधी स्वतः पवार आणि त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिला आहे. पण यंदाच्या निवडणुकीत मोहिते- पाटील हे भाजपच्या बाजूने गेल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पडझड झाल्याने पवार स्वतः त्यासाठी जोर लावत आहेत. दुसरीकडे पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात आपली ताकद आजमावण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसह फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा याठिकाणी झाल्या. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय वगळता आरोप-प्रत्यारोप आणि घराणेशाही या भोवतीच सगळा प्रचार फिरला. विकासाचे मुद्दे कमीच चर्चेत आले. त्यामुळे या थेट लढतीत मतदार कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com