agriculture news in marathi, Todya Kartiki Ekadashi | Agrowon

आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया ॥ : आज कार्तिकी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) : 
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया ॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥

संत तुकाराम महाराज यांच्या या अभंग ओवींचा प्रत्येय येथे आपल्या लाडक्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. रविवारी (ता. १८) राज्यातून विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या नंतर, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. 

पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) : 
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया ॥
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥

संत तुकाराम महाराज यांच्या या अभंग ओवींचा प्रत्येय येथे आपल्या लाडक्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. रविवारी (ता. १८) राज्यातून विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या नंतर, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. 

आज (ता. १९) पहाटे महसलूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून कार्तिकी वारीच्या सोहळ्यात सहभागासाठी राज्यभरातून वारकरी दाखल होत आहेत. रविवारी दुपारपर्यंत सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले होते. एसटी, रेल्वेसह खासगी वाहनाने वारकरी पंढरीत येत आहेत. शहरातील विविध मठ, धर्मशाळातून भजन, कीर्तनाचे सूर आळवले जात आहेत. टाळ-मृदंगाच्या गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने पंढरीत भक्तिरसाचा आगळा उत्साह दाठलेला दिसत आहे. 

रविवारी दशमीच्या स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. चंद्रभागेतील स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन, नगरप्रदक्षिणा यामध्ये वारकरी हरपून गेले आहेत. चंद्रभागा नदीचा काठ, वाळवंटाचा परिसर आणि विठ्ठल मंदिराच्या परिसरात वारकऱ्यांची सर्वाधिक गर्दी झाली आहे. रविवारी श्री विठ्ठलाची दर्शन रांग पत्राशेडच्याही पुढे गेली. प्रतिमिनिटाला ४० ते ५० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत होते. किमान दहा ते १२ तास दर्शनाला लागत आहेत. ६५ एकर परिसरातही वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यंदा दुष्काळाच्या स्थितीमुळे मराठवाडा, विदर्भातून वारकऱ्यांची संख्या मात्र कमी होण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...