agriculture news in Marathi, Tomato at 100 to 1000 rupees in state, Maharashtra | Agrowon

राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल १०० ते १००० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे : सध्या राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक जास्त होत आहे. त्यामुळे या महिन्यात मिळणारे दर हे मागील महिन्यातील दरापेक्षा कमी आहेत. राज्यातील बाजार समित्यांमधील दराचा गुरुवारी (ता.८) आढावा घेतला असता टोमॅटोला किमान १०० रुपये, कमाल १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये दर मिळाला.    

पुणे : सध्या राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक जास्त होत आहे. त्यामुळे या महिन्यात मिळणारे दर हे मागील महिन्यातील दरापेक्षा कमी आहेत. राज्यातील बाजार समित्यांमधील दराचा गुरुवारी (ता.८) आढावा घेतला असता टोमॅटोला किमान १०० रुपये, कमाल १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये दर मिळाला.    

पुण्यात ३०० ते ६०० रुपये
गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.८) टाेमॅटाेची सुमारे सहा हजार क्रेटची आवक झाली हाेती. या वेळी दहा किलाेला ३० ते ६० रुपयांपर्यंत दर हाेता. राज्याच्या विविध भागांमध्ये टाेमॅटाेचे उत्पादन वाढल्याने विविध बाजार समित्यांमधील आवकदेखील वाढली आहे. परिणामी विविध बाजार समित्यांमधून इतर बाजार समित्यांसाठी हाेणारी खरेदी मंदावली असल्याने मालाला उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी दरात घसरण झाली आहे. ७ फेब्रुवारीला १२७६ क्विंटल आवक होऊन ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. ६ फेब्रुवारीला १२५३ क्विंटल आवक तर दर ३०० ते ७०० रुपये होता. ५ फेब्रुवारीला आवक १९७० क्विंटल तर ३०० ते ८०० रुपये दर मिळाला.

कोल्हापुरात ४०० ते १००० रुपये 
येथील बाजारसमितीत टोमॅटोची दररोज दोन हजार कॅरेटच्या आसपास आवक होत आहे. टोमॅटोस प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून टोमॅटोच्या आवकेत थोडी वाढ झाल्याचे बाजारसमितीतून सांगण्यात आले. सध्या शिरोळ, हातकणंगले तालुक्यातून अगदी क्वचित प्रमाणात आवक होत आहे. बहुतांशी आवक बेळगाव सांगली भागातून होत आहे. बाजार समितीत ७ फेब्रुवारीला २१४४ क्रेट आवक तर दर दहा किलोस ४० ते ११० रुपये मिळाला. ३१ जानेवारीला २०६० क्रेट आवक तर दर २० ते ६० रुपये आणि २४ जानेवारीला १८०५ क्रेट आवक तर दर दहा किलोस ३० ते ५० रुपये दर मिळाला. 

सोलापुरात १०० ते ६०० रुपये
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ राहिली. पण टोमॅटोचे दर टिकून राहिले. टोमॅटोला प्रतिक्विंटल १०० ते ६०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक स्थानिक भागातूनच राहिली. पण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून टोमॅटोच्या दराची स्थिती याच पद्धतीने आहे. गेल्या चार आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ राहिली आहे. पण मागणीही तशी जेमतेमच असल्याने दरही टिकून आहेत. १७ जानेवारीला ६३ हजार ९१३ किलो आवक तर दहा किलोचा दर १० ते ३० व सरासरी २० रुपये, २४ जानेवारीला ३५ हजार ३८० किलो आवक तर दर १० ते ५० व सरासरी ३० रुपये, ७ फेब्रुवारीला आवक ३८ हजार १४३ किलो तर दर १० ते ६० रुपये आणि सरासरी ४० रुपये इतका राहिला.

जळगावात ४०० ते ७५० रुपये
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केट यार्डात टोमॅटोची आवक अधिक राहिली. त्याला महिनाभरात सरासरी ६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक कायम असून, त्याच्या लिलावास फारसा प्रतिसाद मिळत नाही. टोमॅटोची आवक चाळीसगाव, भडगाव, जळगाव, यावल आदी भागांतून होते. तसेच धुळे येथूनही काही प्रमाणात आवक होत आहे. गुरुवारी (ता. ८) २८ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ४०० ते ७५० रुपये दर मिळाला. ८ फेब्रुवाला २८ क्विंटल आवक तर दर ४०० ते ७५० रुपये दर मिळाला. १ फेब्रुवारी २३ क्विंटल आवक तर दर ३५० ते ६०० रुपये, २५ जानेवारीला २६ क्विंटल आवक तर दर ४०० ते ६५० रुपये, १८ जानेवारीला २५ क्विंटल आवक तर दर ३५० ते ६०० रुपये मिळाला.

औरंगाबादेत २०० ते ६०० रुपये
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.७) टोमॅटोची १९५ क्‍विंटल आवक होऊन २०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. २ जानेवारीला १०९ क्‍विंटल आवक तर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ जानेवारीला २०१ क्‍विंटल आवक होऊन दर ३०० ते ५०० रुपये, १५ जानेवारीला ११७ क्‍विंटल आवक तर दर ३०० ते ४०० रुपये, २७ जानेवारीला १२७ क्‍विंटल आवक होऊन दर २०० ते ३०० रुपये, ३० जानेवारीला ११९ क्‍विंटल आवक होऊन दर १०० ते ३०० रुपये, तर १ फेब्रुवारीला १९२ क्‍विंटल आवक होऊन १५० ते २५० रुपये आणि ६ फेब्रुवारीला ७३ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

परभणीत ४०० ते ६०० रुपये 
येथील फळे-भाजीपाला मार्केट मध्ये गुरुवारी (ता.८) टोमॅटोची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या स्थानिक परिसरातून टोमॅटोची आवक येत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ५०० ते ७०० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल सरासरी ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. किरकोळ विक्री प्रतिकिलो १० ते २० रुपये दराने सुरू होती असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. १८ जानेवारीला ५०० क्विंटल आवक तर दर ६०० ते ८०० रुपये मिळाला. २५ जानेवारीला ५५० क्विंटल आवक होऊन दर ५०० ते ८०० रुपये, १ फेब्रुवारीला ६०० क्विंटल आवक तर दर ४५० ते ५५० रुपये, ८ फेब्रुवारीला ७०० क्विंटल आवक तर दर ४०० ते ६०० रुपये मिळाला.

नागपुरात ६०० ते ८०० रुपये
येथील कळमणा मार्केटमध्ये गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोची बाजारातील आवक १५० ते १८२ क्‍विंटलवर स्थिरावली आहे. टोमॅटोचे घाऊक दर ६०० ते ८०० रुपये क्‍विंटल असे आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री २५ ते ३० रुपये किलो दराने होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला दर ६०० ते ८०० रुपये क्‍विंटल होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ते ४०० ते ६०० रुपये क्‍विंटलपर्यंत राहिले. २४ जानेवारी ६०० ते ९०० रुपये क्‍विंटलवर दर पोचले. ४ फेब्रुवारीला १२० क्‍विंटलची आवक होऊन दर १००० ते १३०० रुपये क्‍विंटलवर पोचले होते. ५ फेब्रुुवारीला दर ५०० ते ७०० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले. 

साताऱ्यात ३०० ते ४०० रुपये
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ८) टोमॅटोची ९७ आवक झाली होती. प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. गतसप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोच्या आवकेत वाढ असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सातारा, कोरेगाव, जावली तालुक्यातून टोमॅटोची आवक होत आहे. ११ जानेवारीस टोमॅटोची ६८ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल ६०० ते ७०० रुपये मिळाला. पूर्ण जानेवारी महिन्यात टोमॅटोस प्रति क्विंटल ४०० ते ७०० रुपये या दरम्यान दर स्थिर होते. या सप्ताहात दराची परिस्थिती तीच आहे. 

नाशिकला १५० ते ५५० रुपये
नाशिक बाजार समितीत गुरुवारी (ता.८) टोमॅटोची २३० क्विंटलची आवक झाली. त्यास १५० ते ५५० व सरासरी ३५० रुपये क्विंटलला दर मिळाले. नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होते. बुधवारी (ता.७) या बाजार समितीत ७०० क्विंटल आवक होऊन १५० ते ५६० व सरासरी ३५० रुपये दर मिळाले. जिल्ह्यातील टोमॅटोचा हंगाम नुकताच आटोपला आहे. या वेळी टोमॅटो व्यापाऱ्यांनी टोमॅटोकडून इतर फळांकडे मोर्चा वळवला आहे. टोमॅटोला परराज्यातून होणारी मागणी ही स्थिर आहे. या स्थितीत टोमॅटोचे दर मागील पंधरवड्याच्या तुलनेत निम्म्याने उतरले आहेत. येत्या सप्ताहात दर व आवकेची स्थिती अशीच राहील असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...