जळगावात टोमॅटो प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये

टोमॅटो
टोमॅटो

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २८) टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गवारची तीन क्विंटल आवक होऊन २००० ते ३५०० व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लाल कांद्याची २७० क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ३३७५ व सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची ४१ क्विंटल आवक झाली. तीस १००० ते २३०० व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चवळीची तीन क्विंटल आवक झाली, तिस १५०० ते ३२०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची २५ क्विंटल आवक होऊन ८०० ते २२०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. कारल्याची तीन क्विंटल आवक झाली, त्यास १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोथिंबीरची ९ क्विंटल आवक झाली, तीस प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.  बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)  

शेतमाल     आवक     किमान     कमाल     सरासरी
आले     ४५     १०००     २४००     १६००
बटाटा     २००     ३००     ४५०     ३७५
लिंबू     ९     ८००     १४००     १२००
गिलके     ३     ८००     १९००     १२००
फ्लॉवर     ११     ७००     १८००     १२००
भेंडी     ५     ९००     २०००     १५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com