agriculture news in Marathi, tomato arrival decrease in nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मागील पंधरवड्याच्या तुलनेत निम्माच माल खुडला जात आहे. गुणवत्तापूर्ण मालाची उपलब्धता आता कमीच राहील, अशी स्थिती आहे.
- सुभाष पूरकर, टोमॅटो उत्पादक, धोंडगव्हाण, ता. चांदवड, जि. नाशिक.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोची दररोज ५ लाख क्रेट आवक होत होती. गत सप्ताहात झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा खुडत्या अवस्थेतील टोमॅटोला बसला. परिणामी पिंपळगाव बसवंत, लासलगाव, वणी, गिरणारे या बाजारपेठांतील आवक निम्म्याने घटली.

एकट्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील आवक साडेतीन लाखांवरून अवघी ८१ हजार क्रेटपर्यंत कमी झाली आहे. या वेळी टोमॅटोला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १५१ ते ६०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाले. गतवर्षी या भागातील टोमॅटोला नोटाबंदीचा फटका बसला होता. यंदा ती कसर अवकाळी पावसाने भरून काढली. या स्थितीत नाशिकच्या टोमॅटो आगारातून होणारी आवक निम्म्याने घटली आहे.

मागील सप्ताहात सुरवातीपासून पावसाने शिवारात दररोज हजेरी लावली. नाशिक भागातील टोमॅटो हंगामाने वेग घेतलेला असताना जोरदार पावसाने यात अडथळे आले. बाजार आवारातही पाणी साचले असल्याने त्याचा व्यापाऱ्यांनाही फटका बसला. परिणामी या काळात दरातही २० टक्‍क्‍यांपर्यंत उतरण झाली. बुधवारनंतर पाऊस सुरूच असला, तरी बाजारातील आवक घटली. शनिवारी, रविवारी आवकेत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली. परिणामी मागणीत वाढ झाली. सरासरी प्रति २० किलोला २२५ असलेले दर ४२५ पर्यंत वधारले.

नाशिक भागातील गिरणारे, वणी भागांतील टोमॅटोच्या हंगामाने अद्याप गती घेतलेली नाही. येत्या सप्ताहात ही आवक वाढेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र पावसाने या भागातील टोमॅटोचे मोठे नुकसान केले आहे. ही स्थिती पाहता गुणवत्तापूर्ण टोमॅटो मालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या स्थितीत टोमॅटोचे सध्याचे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया
पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. या स्थितीत आवक निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. मागणीची स्थिती पाहता येत्या काळात टोमॅटोचे सध्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.
- संजय पाटील, सचिव, पिंपळगाव बसवंत बाजार समिती.
 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...