नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा, डाळिंबाचे दर स्थिर

नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा, डाळिंबाचे दर स्थिर
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा, डाळिंबाचे दर स्थिर

नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची आवक सरासरी ३० हजार क्रेटची होती. टोमॅटोच्या आवकेत आघाडीवर असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत हीच आवक १ लाख २० हजार क्रेटची होती. प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ३० ते १५५ रुपये व सरासरी ९१ रुपये दर मिळाले. हा दर उत्पादनखर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला.

नाशिकसह लगतच्या नगर, औरंगाबाद जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक होते. यंदा सर्वत्र टोमॅटोची लागवड वाढली असून, त्याचा परिणाम बाजारातील आवक वाढण्यात झाला आहे. पुढील महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोचा मुख्य हंगाम सुरू होणार आहे. त्या काळात आवकेत अजून वाढ होईल. मात्र, त्या काळात बांगलादेश तसेच राज्यातील इतर भागात माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येतही वाढ होईल. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत क्षमतेच्या प्रमाणात अद्याप निम्म्याच आडत्यांनी व व्यापाऱ्यांनी काम सुरू केले आहे. पुढील महिन्यात टोमॅटोतील अडते व व्यापारी संख्येने वाढतील. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

कांदा ४०० ते ९६१ रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गतसप्ताहात कांद्याची १६ हजार क्विंटल आवक झाली. या वेळी कांद्याला क्विंटलला ४०० ते ९६१ व सरासरी ७५१ रुपये दर मिळाले. गोल्टी कांदा ३०० ते ८०० व सरासरी ७२१ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com