agriculture news in marathi, tomato plantation start in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
मी दरवर्षी साधारणपणे तीन ते चार एकरांवर टोमॅटोची लागवड करतो. यंदाही १५ एप्रिलनंतर लागवड करणार आहे. चालूवर्षी देखील सुमारे तीन ते चार एकरांवर लागवडीचे नियोजन आहे. 
- रघुनाथ शिंदे, शेतकरी, खैरेनगर, ता. शिरूर, जि. पुणे.
पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून टोमॅटो पीक लागवडीस सुरवात केली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही टोमॅटोच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
 
टोमॅटो पिकाची लागवड तीनही हंगामात करता येते. खरीप हंगामासाठी जून ते जुलै, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्‍टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात लागवड होते. साधारणपणे २५ ते ३० दिवसांनंतर रोपे लागवडीस येतात. त्यानंतर रोपांची शेतात लागवड केली जाते. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे, मुंबई या शहरातील बाजारपेठ जवळ असल्याने अनेक शेतकरी वर्षभर टोमॅटोचे पीक घेतात.
 
जिल्ह्यात प्रामुख्याने मार्च ते एप्रिल महिन्यात टोमॅटो लागवडीवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे या टोमॅटोला चांगला दर मिळतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या बाजारात टोमॅटोचे दर अपेक्षित नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात टोमॅटो उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, आता लागवड केलेल्या टोमॅटोला जून ते जुलै महिन्यात चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 
 
जिल्ह्यात उत्तरेकडील खेड, आंबेगाव, जुन्नर हे तीन तालुके टोमॅटोचे आगार म्हणून ओळखले जातात. याशिवाय शिरूर, बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर भागातील अनेक शेतकरी टोमॅटोचे पीक घेतात. तसेच मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍यात अल्प प्रमाणात शेतकरी टोमॅटो पीक घेऊ लागले आहेत.
 
गेल्या काही वर्षांपासून खेड, आंबेगाव, जुन्नर भागातील अनेक शेतकरी प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करून टोमॅटो पीक घेत असल्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होत असल्याचे शेतकरी सांगू लागले आहे. अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले, की जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. मात्र, मार्च, एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या टोमॅटोला चांगला दर मिळतो. त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी या महिन्यात लागवडीला अधिक प्राधान्य देतात. 

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...