agriculture news in Marathi, tomato prices at 1200 to 1800 rupees per quintal in parbhani, Maharashtra | Agrowon

परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८०० रुपये
माणिक रासवे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

बाजार समितीत हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होती, तीस १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होती, तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी (ता. १७) टोमॅटोची ४५० क्विंटल आवक होती. त्यास १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

वांग्याची २२ क्विंटल आवक होती, त्यास २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होती, तीस १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होती, तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची ८ क्विंटल आवक होती, त्यास १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

चुक्याची ६ क्विंटल आवक होती, त्यास १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक होती. मेथीला ७०० ते १२०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले.
फ्लाॅवरची ८ क्विंटल आवक होती त्यास ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक होती, तिला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. दोडक्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

गवारीची ८ क्विंटल आवक होती. गवारीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. भेंडीची १० क्विंटल आवक होती. भेंडीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. काकडीची १० क्विंटल आवक होती. काकडीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

लिंबाची १२ क्विंटल आवक होती, त्यास १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. पपईची १५ क्विंटल आवक होती, पपईला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवळ्याची १० क्विंटल आवक होती, त्यास ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
उत्तम निचऱ्याच्या जमिनीत पपई लागवड...पपई फळपिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन...
जमिनीतील जिवाणूंच्या गुणसूत्रीय रचनांचा...जमीन ही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकमेव परिपूर्ण...
तुटपुंजी मदत नको, शंभर टक्के भरपाई द्या...अकोला : गारपिटीने नुकसान झालेल्या...
ग्रामीण भागातील अतिक्रमित घरे नियमित...मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील...
राज्यातील २६ रेशीम खरेदी केंद्रे बंदसांगली ः कमी गुंतवणूक, खात्रीशीर व कायमची...
शिवनेरीवर उद्या शिवजन्मोत्सव सोहळापुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त...
नगर जिल्ह्यात सव्वातीन हजार हेक्‍टरवर...नगर : नगर जिल्ह्यामध्ये महाबीजतर्फे गहू, ज्वारी,...
बदलत्या वातावरणाचा केळीला फटका जळगाव : हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत विषम...
‘ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार...मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या...
आपले सरकारचे संगणकचालक सात...मुंबई : ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान...
जाहीर केलेला हप्ता द्या ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी जाहीर...
औरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल...औरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतीमालाची शासनानेच ठरवून...
सत्तर वर्षे होऊनही शेतकऱ्यांच्या...राळेगणसिद्धी, जि. नगर : देशाला स्वतंत्र...
नोटा घेऊन तुमच्या दरात उभा राहू का? -...वाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक...
परभणी भेंडी प्रतिक्विंटल २५०० ते ३०००...परभणी : येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये...
थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेलमहाराष्ट्रासह, मध्यभारत, पश्‍चिम व पूर्व...
डिंकपोस्टिंग कल्चरद्वारे लवकर कुजवा पीक...शेतीतील टाकाऊ मानले जाणारे पिकांचे अवशेष योग्य...
कोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत...
नव्या दमाने स्वत: काम करणार : महिला...आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे....
गारपीटग्रस्त रब्बी पिकांचे व्यवस्थापनमागील दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील...