agriculture news in marathi, Tomato prices hike in Nashik | Agrowon

नाशिकला टोमॅटो दरात सुधारणा
ज्ञानेश उगले
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नाशिक : मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या बाजाराची परिस्थिती अडचणीची होती. मात्र, गत सप्ताहापासून टोमॅटोचे दर वधारण्यास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोची सर्वाधिक आवक होते. गत सप्ताहात या बाजार समितीत सरासरी अडीच लाख क्रेटची झाली. याही स्थितीत प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ४० ते २८५ व सरासरी १७० रुपये दर मिळाले. दरात प्रतिक्रेटमागे २० ते ६० रुपयांची ही वाढ टोमॅटो उत्पादकांना काहीसा दिलासा देणारी ठरली.

नाशिक : मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या बाजाराची परिस्थिती अडचणीची होती. मात्र, गत सप्ताहापासून टोमॅटोचे दर वधारण्यास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोची सर्वाधिक आवक होते. गत सप्ताहात या बाजार समितीत सरासरी अडीच लाख क्रेटची झाली. याही स्थितीत प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ४० ते २८५ व सरासरी १७० रुपये दर मिळाले. दरात प्रतिक्रेटमागे २० ते ६० रुपयांची ही वाढ टोमॅटो उत्पादकांना काहीसा दिलासा देणारी ठरली.

मागील दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच टोमॅटोच्या दरात दिलासादायक वाढ झाली. पिंपळगाव बसवंतच्या बाजार आवारात टोमॅटोच्या २ लाखांवर क्रेटची आवक होते. त्यात सातत्याने वाढ होत असतानाही ही दरात वाढ झाल्याने टोमॅटो उत्पादकांना दीर्घ कालावधीनंतर हायसे वाटले.

टोमॅटोचे निर्यातदार व्यापारी राजेश म्हैसधुणे म्हणाले, की आतापर्यंत बंगळूरच्या टोमॅटोच्या मार्केटचा मोठा प्रभाव होता. मात्र, हा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून त्याच काळात नाशिक भागातील हंगाम वेग घेत आहे. या स्थितीत नाशिक जिल्ह्यातील बाजारात परराज्यातून खरेदीदार व्यापाऱ्यांचे आगमन सुरू झाले आहे.

बाजारात आवक जास्त असली तरी उच्च प्रतीच्या टोमॅटोचा तुटवडा अधिक आहे. नाशिकच्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती असल्याने त्याचाही फटका टोमॅटोला बसला आहे. यंदा लागवड मोठ्या प्रमाणावर दिसत असली तरी येत्या काळात टोमॅटोला मागणीही वाढेल अशी स्थिती आहे. ही स्थिती पाहता टोमॅटोचे दर स्थिर राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

बंगळूरचा टोमॅटो हंगाम संपला असून नाशिक भागातील हंगामाने वेग धरला आहे. आवक जास्त असली तरी खरेदीदारांना उच्च प्रतीच्या टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. या स्थितीत चांगल्या दर्जाच्या मालाला चांगले दर मिळत आहे. हे दर अजून महिनाभर स्थिर राहतील असा अंदाज आहे.
- राजेश म्हैसधुणे, टोमॅटो निर्यातदार, नाशिक.  

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...