agriculture news in marathi, Tomato production got financial help | Agrowon

टोमॅटो उत्पादनाने मिळाला आर्थिक हातभारही
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जानेवारी 2018

औरंगाबाद : टॅंकरने पाणी टाकून टोमॅटोचे पीक काढणाऱ्या माळीवडगावच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना यंदा केवळ टोमॅटोच्याच दराने तारले. यंदा जवळपास ७५ हजारांवर क्रेट टोमॅटो माळीवडगावातून देशातील विविध बाजारपेठांत गेले. थेट व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीच गावात तळ ठोकून असल्याने काही लोकांना रोजगार व उत्पादकांना अपेक्षित दर मिळून आर्थिक हातभार लागण्याचे काम टोमॅटोच्या एकूणच उलाढालीतून झाले.

औरंगाबाद : टॅंकरने पाणी टाकून टोमॅटोचे पीक काढणाऱ्या माळीवडगावच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना यंदा केवळ टोमॅटोच्याच दराने तारले. यंदा जवळपास ७५ हजारांवर क्रेट टोमॅटो माळीवडगावातून देशातील विविध बाजारपेठांत गेले. थेट व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीच गावात तळ ठोकून असल्याने काही लोकांना रोजगार व उत्पादकांना अपेक्षित दर मिळून आर्थिक हातभार लागण्याचे काम टोमॅटोच्या एकूणच उलाढालीतून झाले.

जवळपास ३०० उंबऱ्यांच्या माळीवडगावातील ४० ते ५० शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून टोमॅटोचे पीक घेणे सुरू केले आहे. जळपास ८० ते ९० एकरांवर टोमॅटोचे पीक असून १ ते ७ एकरांपर्यंत शेतकऱ्यांकडे टोमॅटोचे पीक यंदा होते.

एकाच ठिकाणी चांगल्या दर्जाचे टोमॅटो मिळत असल्याने दिल्ली, राजस्थान, हरियाना, झाशी आदी ठिकाणांवरून टोमॅटो व्यापाऱ्यांनी आपले प्रतिनिधी माळीवडगावात पाठविणे सुरू केले. आलेल्या व्यापाऱ्यांनी गावातील युवा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मध्यस्थ करून त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी केली. त्यामुळे गावातील सात ते आठ शेतकऱ्यांना रोजगार मिळाला. सोबतच गावातील आठ ते दहा मालवाहू वाहनांनाही गावातच जवळपास अडीच-तीन महिने बऱ्यापैकी काम मिळाले.

यंदा माळीवडगावातील टोमॅटोला १७० ते ९०० रुपयांपर्यंत देशाच्या विविध बाजारांत दर मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यंदा उत्पादक शेतकऱ्यांपैकी जवळपास ७० टक्‍के शेतकऱ्यांनी दुर्रीचे पीक घेतले. ७५ हजार क्रेट मालाचे उत्पादन देशाच्या विविध बाजारांत गेले असले, तरी यंदा किमान १५ ते २० हजार क्रेट टोमॅटो अमरावती, परभणी, औरंगाबाद व इतर लोकल बाजारांत गेले.

२०१६ मध्ये पाच ते सहा शेतकऱ्यांमार्फत जवळपास ९० हजार क्रेट टोमॅटो विविध राज्यांतील बाजारपेठांत पाठविले होते. टंचाईमुळे पाण्याचे महत्त्व ओळखलेल्या माळीवडगाववासीयांनी जलसंधारणाच्या कामात योगदान देण्यासाठीही पुढाकार घेणे सुरू केले आहे.

पाण्याची भीषण टंचाई असताना शेतकऱ्यांनी धाडसाने टोमॅटोची लागवड केली व टॅंकरने पाणी देऊन उत्पादन घेतले. सरासरी चांगले दर मिळाले. सोबतच ७५ हजारांवर क्रेट देशाच्या विविध बाजारांत गेले. केवळ रोजगारच मिळाला नाही, इतर पिकांच्या तुलनेत टोमॅटोने मोठा आधार दिला.
- विलास गवळी,
शेतकरी, माळीवडगाव, जि. औरंगाबाद.

 

व्यापाऱ्यांशी थेट संपर्क आल्याने देशातील बाजारपेठांची दरस्थिती, त्यामधील चढउतार कधी व केव्हा असतात हे कळले. खरेदीतील मध्यस्थीमुळे उत्पादनाबरोबरच थोडीबहूत अर्थार्जनाचीही संधी मिळाली.
- सोमीनाथ गोरे,
शेतकरी माळीवडगाव, जि. औरंगाबाद.

 

गावातील एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास दहा टक्‍केच शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. त्यापैकी काहींकडे शेततळे आहे. ज्यांनी टोमॅटोचे उत्पादन यंदा घेतले त्यांना इतर पिकाच्या तुलनेत चांगला पैसा मिळाला.
- विठ्‌ठल जिते, शेतकरी जि. औरंगाबाद.

 

इतर बातम्या
तीन जिल्ह्यांत एक लाख क्‍विंटल तूर... औरंगाबाद  : खरेदी केंद्रे सुरू होऊन तूर...
नांदेड विभागातील बत्तीस कारखान्यांकडून... नांदेड  ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
बुलडाण्यातील २९ लघू प्रकल्प कोरडे बुलडाणा : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत...
‘स्मार्ट व्हिलेज’मधील गावांत इजिप्तच्या...टाकळी हाजी/आळेफाटा, जि. पुणे ः सकाळ माध्यम...
सोलापूर जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी सोलापूर  : राज्य शासनाने पाणीटंचाईवर...
पूर्व विदर्भात धानाची उत्पादकता हेक्टरी... नागपूर  ः कमी पाऊस त्यासोबतच हंगामात...
काबुली हरभरा आयात शुल्क ६० टक्क्यांवरनवी दिल्ली ः हरभरा आवक बाजारात सुरू झाल्यापासूनच...
जळगाव जिल्ह्यात गव्हाची आवक वाढतेय जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ऊस पाचट व्यवस्थापनाकडे... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात गोदामे उपलब्ध नसल्याने... जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी रखडली असून...
राज्यात उन्हाचा चटका वाढलापुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाचा...
गाळ काढण्यासाठी सुरुंग; `जलयुक्त’ला...पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त...
पुणे जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०३ लाख... पुणे  ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा...
दहा हजारांहून अधिक गावांची पाणीपातळी...पुणे : उन्हाचा चटका वाढू लागला असून,...
भाजीपाला उत्पादक खचलाकोल्हापूर : एकेकाळी भाजीपाल्याचे वैभव शिरावर घेऊन...
पुणे जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरूपुणे  ः दिवसेंदिवसे शेतीकामांसाठी मजुरांचा...
ढगाळ हवामानाचा काजू उत्पादनाला फटकासिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस...
कृषी विभागाच्या योजनांना गती द्या :...मुंबई : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना...
अॅग्री बिझनेस पदवीसाठी 'आयसीएआर'ची समितीपुणे : देशातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी...
कोयना धरणातील पाणीसाठा २५ टीएमसीने...मुंबई : कोयना धरणामध्ये २५ टीएमसी पाणीसाठा...