agriculture news in marathi, tonic seller in trouble due to role of agri department, Maharashtra | Agrowon

कृषी खात्याच्या भूमिकेमुळे संजीवके विक्रेत्यांना फटका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

खते किंवा संजीवके यांचा वापर हा पिकांसाठी फायदेशीर ठरणारा असतो. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. साहजिकच त्याकडे किडी आकर्षित होऊ शकतात. हे केवळ गुलाबी बोंड अळीपुरतेच लागू नसून सर्वच किडींबाबत आणि सर्व पिकांबाबतच लागू होते. पण म्हणून संजीवके किंवा तत्सम घटकांच्या वापरांमुळे गुलाबी बोंड अळी येते असे म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही. मुख्य म्हणजे बीटी बियाणे गुलाबी बोंडअळीला प्रतिकारक्षम राहिलेले नाही. अळीच्या नियंत्रणासाठी अनेक उपायांमध्ये मुख्यत्वे ‘रेफ्युजी’ बियाण्याचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. अशी अनेक कारणे बोंडअळीच्या प्रादुर्भावामागे देता येतील.
- डॉ. आदिनाथ पासलावार, प्राध्यापक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
 

पुणे: अधिक उत्पादनाच्या नावाखाली कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली नसतानाही अनावश्यक संजीवकांचा वापर शेतकरी करीत असल्याचे कृषी खात्याचे निरीक्षण चुकीचे आहे. त्यामुळे आम्हाला संजीवके व वाढ उत्प्रेरके विक्रीत तोटा सहन करावा लागतो, अशी तक्रार अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे.
 
‘‘अधिक उत्पादनाच्या नावाखाली कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली नसतानाही अनावश्यक संजीवकांचा वापर शेतकरी करतात. संजीवकांचा वापर केल्याने कापूस, सोयाबीनच्या हिरवेपणा व लुसलुशीतपणात वाढ होते. परिणामी, मोठ्या प्रमाणात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संजीवके व वाढ उत्प्रेरके वापर करु नये,’’ असे आवाहन आयुक्तांनी केले होते.

 संजीवके व वाढ उत्प्रेरकांच्या विरोधाबाबत कृषी खात्याने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात संघटनेने  कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना लेखी निवेदन दिले आहे. ‘‘शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही तत्पर असता. यवतमाळची विषबाधा प्रकरण ही दुर्दैवी घटना होती. तुमचे प्रयत्न योग्य आहेत. मात्र, वाढ उत्प्रेरकांच्या बाबत भूमिका अयोग्य आहे,’’ असे संघटनेने म्हटले आहे.
 
संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील व सचिव समीर पाथरे यांच्या म्हणण्यानुसार, वाढ उत्प्रेरके, संजीवकांमुळेच १०-२० टक्के उत्पादन वाढत असल्याचे अहवाल कृषी विद्यापीठांनी दिलेले आहेत. तरीही गेल्या वर्षी कृषी खात्याने बिगर नोंदणीकृत उत्पादनावर बंदी घातली होती. मात्र, बंदीला न्यायालयाने स्थगिती दिली. तेव्हापासून आमच्या विक्रीस खाते अटकाव करीत असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार करीत आहे.

‘‘तुमच्या भूमिकेमुळे शेतकरी वाढ उत्प्रेरके वापरणार नाहीत. यातून उत्पादक व विक्रेत्यांना प्रचंड तोटा होईल. टॉनिक, संजीवकांमुळे पाने टवटवीत होत असली तरी ते पूर्ण सत्य अजिबात नाही. त्याने कीड वाढते हे म्हणणे देखील खरे नाही. गेल्या २५ वर्षांपासून वाढ उत्प्रेरकांचा वापर केला जातोय. त्यामुळे गेल्या वर्षीच कीड वाढली, असे कसे म्हणता येईल,’’ असा सवाल संघटनेने विचारला आहे. 

पाने टवटवीत झाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो
पाने टवटवीत झाल्यामुळे फायदा होत नसल्याचे आपले खाते कसे काय म्हणत आहे. शेतीमधील तज्ज्ञ आपल्या खात्यात आहेत. पिके पानांद्वारे अन्न पुरवठा प्रक्रिया सुरळीत पार पाडतात. त्यामुळे उत्पादन वाढते. संजीवकांना केंद्रीय कीटकनाशक मंडळाने नोंदणी क्रमांक दिला आहे. कृषी खात्यानेच संजीवकाला विक्री परवाना दिला आहे. त्यामुळे तुम्ही वापरास प्रतिबंध करणे योग्य नाही, असे संघटनेने म्हटले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...