संपूर्ण कर्जमाफी अन्‌ दीडपट हमीभाव द्या : स्वाभिमानी

संपूर्ण कर्जमाफी अन्‌ दीडपट हमीभाव द्या : स्वाभिमानी
संपूर्ण कर्जमाफी अन्‌ दीडपट हमीभाव द्या : स्वाभिमानी

सोलापूर : देशातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व शेतकऱ्यांना उत्पादनखर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत मांडण्यात येणाऱ्या दोन्ही विधेयकांना संसदेच्या पटलावर ठेवावे व सर्वपक्षीय खासदारांनी त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १५) करण्यात आली.  या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, शिवाजी भाड-पाटील, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, विजय रणदिवे, तानाजी बागल, नवनाथ माने, सचिन पाटील, सत्यवान गायकवाड, उमाशंकर पाटील, नरेंद्र पाटील, सौदागर खोडके, वसंत गायकवाड, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. हे दोन्ही कायदे मंजूर झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील. शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय यांनाही लाभ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. या मागणीसाठी ग्रामसभेत ठरावही घेण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com