agriculture news in marathi, tour of ministers at Atpadi, Khanpur | Agrowon

आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता दौरा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं निघून गेले... याचीच सध्या जत, आटपाडी परिसरात चर्चा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख दुष्काळी दौऱ्यावर आले होते. त्यांनी हा दौरा धावता केला. पालकमंत्री गावाच्या बाहेरूनच गेले. त्यामुळे मदत मिळणार का? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं निघून गेले... याचीच सध्या जत, आटपाडी परिसरात चर्चा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख दुष्काळी दौऱ्यावर आले होते. त्यांनी हा दौरा धावता केला. पालकमंत्री गावाच्या बाहेरूनच गेले. त्यामुळे मदत मिळणार का? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यातील दुष्काळी भागातील आटपाडी, जत आणि खानापूर तालुक्‍यात शनिवारी (ता. १३) जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी एका गावाला भेट दिली. दरम्यान, केवळ दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यामुळे शेतकरी आपली कैफियत मांडण्यासाठी सकाळपासूनच गावात जमले होते. मंत्री सुभाष देशमुख ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर रस्त्याकडेला गाड्या लावून पालकमंत्री श्री. देशमुख बाजूच्याच शेतात गेले. अवघ्या दहा मिनिटांतच दौरा केला. दरम्यान, ग्रामपंचायतीसमोर साहेबांच्या प्रतीक्षेत अनेक ग्रामस्थांना त्यांची कैफियत मांडतादेखील आली नाही.  

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख सांगली जिल्ह्यातील तळवडे (ता. आटपाडी) कुंभारी (ता. जत) आणि हिवरे (ता. खानापूर) या तीन गावांतील दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आले होते. पालकमंत्री श्री. देशमुख प्रत्येक गावातील दुष्काळाचा आढावा घेऊन पुढे गेले. ‘साहेब, पेरायलाच पाऊस नाही तिथं उगवायचा प्रश्न नाही. पिण्याच्या पाण्याचे आणि जित्राबाच्या चाऱ्याचे वांदे झाले आहेत,’ अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची कैफियत ऐकूनच घेतली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मदत मिळणार का?
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळातील परिस्थितीचा आढावा घेण्यास मंत्र्यांना सांगितले आहे. मात्र, मंंत्र्यांनी केवळ धावता दौरा केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळी दौरा केला असला, तरी मदत मिळणार का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
‘आमच्या गावात पालकमंत्री आल्यानंतर आमचे गाऱ्हाणे न ऐकताच ते निघून गेले. आम्हाला शासनाने मदत करावी, अशी आमची मागणी आहे.’
दाजी पाटील, शेतकरी, कुंभारी, ता. जत

 

इतर बातम्या
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...