agriculture news in marathi, tourist response increase for straberry festival, satara, maharashtra | Agrowon

थेट बांधावर जाऊन पर्यटकांनी घेतला स्ट्रॉबेरीचा आस्वाद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018
सातारा  : पुस्तकांचे गाव असलेल्या भिलार येथे स्ट्रॉबेरी व पर्यटन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) पर्यटकांनी स्ट्रॉबेरीचा थेट बांधावर जाऊन आस्वाद घेतला. या महोत्सवास प्रतिसाद वाढत आहे. एक एप्रिलपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असल्याचे अायोजकांकडून सांगण्यात आले.
 
सलग सुट्या आल्याने पर्यटकांची पावले पाचगणी- महाबळेश्वरकडे वळाली आहेत. सकाळपासून पर्यटकांची भिलार परिसरात रीघ सुरू होती. शेतात जाऊन हाताने तोडून स्ट्रॉबेरी खाण्याची मजा हे पर्यटक लुटत होते. तसेच पर्यटक शेतातील स्ट्रॉबेरी व इतर भाज्यांचीही खरेदी करताना दिसत होते.
 
भिलार येथे जॅम, जेली, वाइन, स्ट्रॉबेरी, मलबेरी, खाद्यपदार्थ, महिला बचत गटाची उत्पादने यांची विविध स्टॉलही उभारले आहेत. ठिकठिकाणी पर्यटकांना माहिती देण्यासाठी शेतकरी सज्ज असल्याचे दिसून येत होते. महोत्सवाच्या माहितीसाठी पाचगणी, महाबळेश्वर व भिलारमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले होते.
 
भिलार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. तसेच पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. स्ट्रॉबेरीची प्रतिकिलोस १०० ते १२० रुपये दराने विक्री केली जात आहे.  

इतर ताज्या घडामोडी
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...
'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...
साताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...
जुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...
बायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...
हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...
बार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...
मुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...
उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...
कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...