तलाव, बंधाऱ्यांच्या कामांची होणार तपासणी ः मांढरे

तलाव, बंधाऱ्यांच्या कामांची होणार तपासणी ः मांढरे
तलाव, बंधाऱ्यांच्या कामांची होणार तपासणी ः मांढरे

पुणे : पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणारी, पाझर तलाव, सिमेंट बंधाऱ्यांचे कामे निकृष्ट दर्जाची आहेत. बंधारे बांधताना तीन ते चार दिवसांत काम पूर्ण होते. अधिकारी कामाच्या ठिकाणी फिरकत नाही, निकृष्ट बांधकामामुळे बंधारे गळतीला लागले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या कामांची तपासणी करण्याची मागणी सदस्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली. यावर वर्षभरात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामांची तपासणी करण्याचे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.

जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे यांनी निकृष्ट दर्जाच्या बंधाऱ्यांचा विषय सभागृहात मांडला. अधिकारी परस्पर बंधारे बांधत असून, ठेकेदार आणि अधिकारी मिळून मिसळून काम करत कामांच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याने, तीन ते चार दिवसांत बंधारे बांधून तयार होतात. अधिकारी कामाच्या ठिकाणी फिरकतही नाही, एसी रूममध्ये बसून बंधारे बांधतात. त्यामुळे काही बंधारे आता गळतीला लागले आहे आणि हेच अधिकारी पालकंत्र्यांकडून स्वत:ची पाठ थोपटून घेतात, असा आरोप केला. शिवसेनेच्या गटनेत्या अाशा बुचके यांनी जुन्नर तालुक्‍यात बंधारा बांधण्यासाठी ७० लाख रुपये देऊनही बंधारा बंधाण्यात आला नसल्याचे सांगितले.

या दिरंगाईला जबाबदार कोण असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. छोटे पाटबंधारे विभागातील विषय हाताळून आमची ‘पीएचडी’ झाली. मात्र, हे अधिकारी अजूनही झोपलेच आहेत, असा टोला रणजित शिवतारे यांनी केला. निकृष्ट दर्जाचे असलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, खरच ज्या ठिकाणी चांगले बंधारे उभारले त्या ठिकाणी कौतुकही करा, अशी भूमिका गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी मांडली.

अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात असले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, या प्रकरणी चौकशी करण्यात येईल. सदस्यांनी बंधाऱ्याबाबत तक्रारी कराव्यात, त्या बंधाऱ्यांची तपासणी केली जाईल, निकृष्ट बंधाऱ्यांचे बिल रोखून धरण्यात येईल, असे सभागृहाला सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी वर्षभरातील बंधाऱ्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येईल, यात अंदाजपत्रक, कामाची जागा, मोजमाप, खर्च योग्य आहे का, साठवण होणाऱ्या पाण्याची क्षमता आदी बाबींची तपासणी केली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com