agriculture news in Marathi, tractor rental platform launched in Odisha, Maharashtra | Agrowon

ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभ
वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

ओडिशा राज्यातील जवळपास ९१.८ टक्के शेतकरी हे मध्यम आणि अल्प भूधारक आहेत. अशा शेतकऱ्यांची पत कमी असल्याने यंत्रे खरेदीसाठी कर्जे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेतीत यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी मदत होईल. ‘जेफार्म सर्व्हिसेस’चा हा उपक्रम अद्वितीय असा आहे. 
- मल्लिका श्रीनिवासन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘टाफे’

भुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत यंत्रे आणि ट्रॅक्टर शेतीकामासाठी उपलब्ध व्हावेत, यासाठी ओडिशा सरकारने ट्रॅक्टर आणि कृषी औजारे भाडोत्री तत्त्वावर (ट्रॅक्टर ॲँड फार्म इक्विपमेंट रेंटल प्लॅटफॉर्म, टाफे) देण्याचे केंद्र सुरू केले आहे. केंद्रामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि अद्ययावत कृषी अवजारे वापरासाठी देण्यात येणार आहेत. या केंद्राचे उद्‌घाटन राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाइक यांच्या हस्ते नुकतेच झाले.

ओडिशा राज्यात मध्यम आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पत कमी असल्यामुळे या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा अद्ययावत यंत्रे खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणावर मर्यादा येऊन उत्पादनही कमी होत आहे. शेतकऱ्यांची अद्ययावत यंत्रांची समस्या सोडविण्यासाठी ओडिशा राज्य सरकारने भाडे तत्त्वावर ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे देण्यासाठी केंद्र सुरू केले आहे.

राज्य सरकारने या योजनेचे नाव ‘जेफार्म सर्व्हिसेस’ असे ठेवले आहे. ट्रॅक्टर आणि शेती अवजारे भाडे तत्त्वावर देण्याची कल्पना ही अद्वीतीय आहे. सीएसआर च्या माध्यमातून ‘टाफे’ केंद्र सुरू करण्यात येत असून, देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याचे उद्दिष्ट आहे. ‘जेफार्म सर्व्हिसेस’ हे ओडिशा कृषी मंत्रालय आणि ‘टाफे’ कंपनीच्या ‘सीएसआर’चा संयुक्त उपक्रम आहे. याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे मोफत भाडे तत्त्वावर देणे हा आहे.

‘टाफे’ कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिका श्रीनिवासन यांनी सांगितले, की देशात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे त्यांना शेतीत नविन तंत्रज्ञान वापरावर बंधने येत असून, याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होत आहे. ‘जेफार्म सर्व्हिसेस’च्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध होणार असून, ॲपद्वारेही यंत्रे उपलब्ध होतील. देशातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ दुप्पट करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचा लाभ होणार आहे. 

यांत्रिकीकरण वाढीस मदत
‘जेफार्म सर्व्हिसेस’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या यंत्रांची उपलब्धता होणार आहे. हा उपक्रम ओडिशा राज्याचा कृषी विभाग आणि ‘टाफे’च्या ‘सीएसआर’चा संयुक्त आहे. यातून मध्यम आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी मदत होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या मोठ्या राज्यांमध्ये केलेल्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला असता, ६५ हजार वापरकर्त्यांकडून सव्वा लाख ट्रॅक्टरची नोंदणी झाली होती. या योजनेतून कंपनीलाही फायदा होत आहे.  

इतर अॅग्रो विशेष
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...