agriculture news in marathi, Tractor sales to reach record high this fiscal: India Ratings | Agrowon

ट्रॅक्टरची यंदा विक्रमी विक्री होण्याचा अंदाज
वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीत उच्चांकी वाढ होण्याची शक्यता ‘इंडिया रेटिंग’ या संस्थेने म्हटले आहे. या आधीच्या २०१४ च्या ६ लाख ९६ हजार ८२८ ट्रॅक्टर विक्रीचा आकडा यंदा पार होण्याची अपेक्षा आहे. 

नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टरच्या विक्रीत उच्चांकी वाढ होण्याची शक्यता ‘इंडिया रेटिंग’ या संस्थेने म्हटले आहे. या आधीच्या २०१४ च्या ६ लाख ९६ हजार ८२८ ट्रॅक्टर विक्रीचा आकडा यंदा पार होण्याची अपेक्षा आहे. 

या संस्थेने म्हटले आहे, की एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ट्रॅक्टर उद्योगाने विक्रीमध्ये गरुड झेप घेत १६.६ टक्के वाढ नोंदविली आहे. या कालवधीत देशांतर्गत ६ लाख ५९ हजार १७० ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टरविक्रीत सातत्याने वाढ होत आहे. दोन वर्षांपूर्वी सतत पडलेल्या दुष्काळानंतर झालेला चांगला मॉन्सून, पोषक वातावरणाने पीक उत्पादनात झालेली वाढ, तसेच सध्या शेतकऱ्यांना सहज मिळत असलेला पतपुरवठा आणि बिगर शेती कामासाठी वाढलेला ट्रॅक्टरचा वापर यामुळे विक्री वाढली आहे. मागील दोन वर्षांतील चांगल्या मॉन्सूनंतर पुढील वर्षी २०१९ च्या हंगामात चांगल्या मॉन्सूनची शाश्वत देता येत नसली तरी वर्ष २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये ट्रॅक्टर उद्योगात झालेली वाढ बघता २०१९ मध्ये ही वाढ कायम राहील असा अंदाज आहे. त्यामुळे २०१९ मध्येही ट्रॅक्टर विक्रीतील वाढ ही याच गतीने होईल, असेही या संस्थेने म्हटले आहे.

‘‘ट्रॅक्टर विक्री ही प्रामुख्याने मॉन्सूनवर आधारीत आहे. चांगला मॉन्सून नसेल तर याचा परिणाम उद्योगावर होतो. २०१५ व २०१६ या वर्षांमध्ये मॉन्सून चांगला झाला नसल्याने उद्योगाच्या विक्रीत १० टक्के आणि ९ टक्के घट झाली होती. तसेच महत्त्वाच्या चार ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या महसुलात ३ टक्के आणि ११ टक्के घट झाली होती. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित सकल मूल्यवर्धन दरात २०१८ मध्ये घट होणार असल्याचे सांगितले. मुख्यत्वे २०१८ मध्ये देशात असमान पाऊस झाला. काही भागात जास्त तर अनेक भागात कमी पावसाने खरिप आणि रब्बी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रभाव पडला आहे. त्यामुळे शेती, वने आणि मासेमारी या क्षेत्रातील सकल मूल्य वर्धनाचा दर हा २०१७ मधील ४.९ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे सांगितले आहे’’, असेही या संस्थेने म्हटले आहे. 

ट्रॅक्टर खरेदीमध्ये शेती क्षेत्रात कर्जाची थोडी समस्या जाणवते. तसेच कर्ज परतफेडीची भीती निर्माण होते. सध्या विक्री होणाऱ्या एकूण ट्रॅक्टर्सपैकी जवळपास ४५ टक्के ट्रॅक्टर्स खरेदीदारांना संघटीत क्षेत्रातील संस्थांकडून कर्ज दिले जाते. कर्ज देताना शेतकऱ्याची आर्थिक क्षमता पाहिली जाते आणि ती शेतीवर अवलंबून असते. समजा २०१९ मध्ये चांगला मॉन्सून राहिला नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे ट्रॅक्टर विक्रीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि पूरक व्यवसायाला मदत करण्यासाठी ६३८ अब्ज 
रुपयांची तरतूद केली आहे. या क्षेत्रासाठी तरतूद केलेल्या निधीची उपलब्धता वेळेवर केली तर ट्रॅक्टर्स आणि शेती अवजारांची मागणी वाढू शकते आणि त्याचा सर्वात जास्त लाभ हा ट्रॅक्टर उद्योगाला होणार आहे, असेही नमूद केले आहे. 

एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा लि. आणि इस्कॉर्टस् लि. या दोन्ही कंपन्यांच्या देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत १८ टक्के आणि १७.५ टक्के वाढ झाली आहे. 

राज्य सरकारांचे अनुदान
देशातील अनेक राज्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना २५ टक्क्यांपर्यंत अनुदान देतात. तर आसाम या राज्यात शेतकऱ्यांना तब्बल ७५ टक्के अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी दिले जाते. ट्रॅक्टरमध्ये जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असल्याने बिगर शेती वापरासाठीही मागणी वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम आणि पायाभूत उद्योगांमध्ये वापर वाढला आहे. जवळपास २० टक्के ट्रॅक्टरचा वापर बिगर शेती व्यवसायाठी केला जातो तर तब्बल ८० टक्के वापर हा शेतीसाठी केला जातो. तसेच सरकारने सुरू केलेल्या महामार्ग विकास कामासाठीही ट्रॅक्टर्सचा वापर वाढू शकतो.

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...