agriculture news in marathi, tractor without driver, pune | Agrowon

शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना ट्रॅक्टर !
मनोज कापडे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

'देशाच्या शेतीत यांत्रिकीकरणाचा विकास झपाट्याने होत आहे. रोबोटकडून शेतीची कामेदेखील केली जातील. 2050 पर्यंत देशात रोबोट फार्मिंगचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असेल. रोबोट फार्मिंग युगाची सुरवात म्हणून ड्रायव्हरलेस ट्रॅक्टरकडे पाहिले जात आहे, असे मत यांत्रिकीकरणातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय शेतीत ट्रॅक्टर आला तेव्हा शेतकऱ्यांनी बिचकत स्वागत केलं होतं. आता शेतीचा प्राण बनलेल्या ट्रॅक्टरवरचा चालक (ड्रायव्हर) बेपत्ता होणार आहे. चालकविना शेतीकाम करणारा ट्रॅक्टर याच वर्षी महाराष्ट्रातल्या शेतशिवारांमध्ये काम करताना दिसेल. शेतीतील पहिला रोबोट म्हणून ही घटना पाहिली जाईल, असे ट्रॅक्टर उद्योगातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

'ड्रायव्हर नसतानाही शेतीची कामे करणारा ट्रॅक्टर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या चेन्नईतील संशोधन प्रकल्पात तयार झाला आहे. या ट्रॅक्टरच्या चाचण्या आम्ही पुणे जिल्ह्यात घेतल्या. आमच्या अपेक्षेपेक्षाही शेतकऱ्यांना उत्तम सेवा देण्याची ताकद असलेला हा ट्रॅक्टर याच वर्षी महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती 'महिंद्रा'मधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मनुष्यबळ खर्चात बचत होणार
ट्रॅक्टर उद्योगातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भारतात याच दशकात 20 एचपी ते 100 एचपी ताकद असलेल्या श्रेणीतील ट्रॅक्टर 'ड्रायव्हरलेस' होतील. पहिल्या टप्प्यात 50 ते 57 एचपी श्रेणीतील 'ड्रायव्हरलेस' ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी विक्रीस उपलब्ध होतील. सध्या या श्रेणीतील पारंपरिक म्हणजे चालक असलेल्या ट्रॅक्टरच्या किमती सात लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान आहेत. ड्रायव्हरलेस ट्रॅक्टरमध्ये तंत्रज्ञानाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात चालक नसलेल्या ट्रॅक्टरच्या किमती जादा असतील. अर्थात, चालक नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मनुष्यबळ खर्चात मोठी बचत होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शेतीकामे होणार बिनचूकपणे
'आमच्या मते 'ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर' शेतकऱ्यांना वरदान ठरतील. सध्या ट्रॅक्टर कामात स्वतः शेतकऱ्यालाच गुंतून पडावे लागते किंवा चालक तरी ठेवावा लागतो. 'ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर'मुळे शेतकऱ्यांचा खूप वेळ वाचेल, उत्पादन खर्चात बचत होईल आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतीकामे बिनचूकपणे होणार असल्यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल, अशी माहिती ट्रॅक्टर उद्योगातील अभ्यासक आशिष गुप्ता यांनी दिली.

टॅबलेटच्या साहाय्याने नियंत्रण
'ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर'मध्ये चालकाचे स्टेअरिंग थेट जीपीएस तंत्राद्वारे फिरवले जाईल. नेमून दिलेल्या अंतरात आणि रेषेतच ट्रॅक्टर चालणार असल्यामुळे शेतीचे काम बिनचूक होईल. ट्रॅक्टरला मागे लावलेले अवजार उचलणे, वळण घेवून पुन्हा अवजार चालविणे अशी कामे ट्रॅक्टर स्वतःहून करेल.

या ट्रॅक्टरला 'जिओफेन्स लॉक' तंत्र बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतीकाम करताना रेषा सोडून ट्रॅक्टर बाहेर जात असल्यास ट्रॅक्टर बंद होण्याची सुविधा असल्यामुळे अपघाताची शक्यताही नाही. आपत्कालिन स्थितीत इंजिन चालू-बंद करण्याची सुविधा तसेच टॅबलेटच्या साहाय्याने ट्रॅक्टर नियंत्रित होत असल्यामुळे शेतकऱ्याला वावरात न उतरता बाहेर थांबून ट्रॅक्टरला हवे तसे काम करण्यास सांगता येईल.

व्हिडीओ गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....