agriculture news in marathi, Trader delaying payement of farmers faces land seize action | Agrowon

पैसे थकविल्याने व्यापाऱ्याची जमीन जप्त
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मालेगाव, जि. नाशिक : मुंगसे येथील जय भोलेनाथ ट्रेडर्सचा कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी याने मालेगाव तालुक्यातील ७७७ कांदा उत्पादकांची दोन कोटींहून अधिक रक्कम थकवली आहे. याप्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी जमीन महसूल थकबाकी वसुलीच्या (आरआरसी) कार्यप्रणालीनुसार कठोर पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी सूर्यवंशीच्या पत्नीच्या नावे असलेली मुंगसे शिवारातील १ हेक्टर ८२ आर जमीन शुक्रवारी जप्त केल्याची माहिती देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालेगाव, जि. नाशिक : मुंगसे येथील जय भोलेनाथ ट्रेडर्सचा कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी याने मालेगाव तालुक्यातील ७७७ कांदा उत्पादकांची दोन कोटींहून अधिक रक्कम थकवली आहे. याप्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी जमीन महसूल थकबाकी वसुलीच्या (आरआरसी) कार्यप्रणालीनुसार कठोर पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याप्रकरणी सूर्यवंशीच्या पत्नीच्या नावे असलेली मुंगसे शिवारातील १ हेक्टर ८२ आर जमीन शुक्रवारी जप्त केल्याची माहिती देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, सचिव अशोक देसले उपस्थित होते. गेल्या वर्षी सूर्यवंशीने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून तो बांग्लादेशी व्यापारी व पिंपळगाव येथील युनूस नामक व्यापाऱ्यास विकला होता. मात्र, त्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी बाजार समितीचे पथक बांग्लादेशमध्ये जाऊन रिकाम्या हाताने परतले होते. अखेर हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेले. याविषयी देवरे यांनी सांगितले, की अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार २० जून रोजी सूर्यवंशीच्या घरून दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता थेट त्याच्या पत्नीच्या नावे मुंगसे येथील शेतजमीन जप्तीची कारवाई करण्यात आली. आता या जमिनीचा जाहीर लिलाव करण्याचा प्रस्ताव सोमवारी प्रांत अजय मोरे यांना देणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. या लिलावातून जमा होणारी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल. पिंपळगाव येथील व्यापारी युनूसबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार आहे. सुनील देवरे यांनी सांगितले, की या कारवाईसोबतच सूर्यवंशी याचा जमीनदार अग्रवाल याच्यावरही आरआरसीनुसार कारवाई करण्याबाबत प्राधिकरणला पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...