पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे.
बातम्या
येवला, जि. नाशिक : विक्रीला आणलेल्या कांद्यात वांधा घालीत व्यापाऱ्याने एका शेतकऱ्याला जबर मारहाण केल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. हा प्रकार बाजार समितीच्या आवाराबाहेर व्यापाऱ्याच्या खळ्यावर घडला आहे. व्यापाऱ्याच्या या मुजोर वागण्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

बुधवारी रात्री अनकुटे येथील वाल्मीक गायकवाड या शेतकऱ्याने येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या खळ्यावर खरेदीसाठी आलेल्या मनमाड येथील व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्यावरून वांधा घातला होता. कांद्याच्या प्रतीवरून व्यापाऱ्याने कांदा खाली करण्यास नकार दिला. यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यास जबर मारहाण करण्यात अाली, काही काळ व्यापाऱ्यांच्या खळ्यावर श्री. गायकवाड बेशुद्ध अवस्थेत पडून होते. काही वेळाने गायकवाड यांना खासगी रुग्णालयात नातेवाईक मित्रांनी दाखल केले. दोन दिवस बाजार समितीची सुटी असल्याने हा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
बाजार समिती प्रशासनाने हा व्यापारी आपल्याकडील नसल्याचे सांगितले आहे. बुधवारी सायंकाळी कार्यालय बंद झाल्यावर शेतकरी व व्यापारी यांच्यात हाणामारी झाली. तो व्यापारी बाजार समितीचा नसून हा वाद खळ्यावर झाला असल्याने यात बाजार समितीचा कुठलीही भूमिका येत नाही, असे सचिव डी. सी. खैरनार यांनी सांगितले. या प्रकरणी रविवारी (ता. ४) दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
...थेट मारायलाच सुरवात केली
“त्या व्यापाऱ्याने माझे कांदे घेतल्यावर त्यात वांधा म्हणजे कुरापत काढली. मी वांधाबिंधा काही नसून माझे कांदे व्यवस्थित भरून द्या असे सांगितले. यावर थेट मारायलाच सुरवात केली. व्यापाऱ्याने मारल्यावर मी रामेश्वरदादाच्या खळ्यात गेलो. तेथे मी पाऊण तास पडलो. मात्र एकाही व्यापाऱ्याने मला उचलले नाही. उलट्या प्रमाणाबाहेर झाल्या असून, त्यामुळे कुणीच उचचले नाही. लहान भावाने व त्याचे जोडीदार होते त्यांनी येथे दवाखान्यात आणले,’’ असे वाल्मीक गायकवाड यांनी सांगितले.
- 1 of 567
- ››