कृषी विज्ञान केंद्राच्या नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू

कृषी विज्ञान केंद्राच्या नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू
कृषी विज्ञान केंद्राच्या नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू

औरंगाबाद : महाराष्ट्रासह गुजरात आणि गोवा राज्यातील २१ कृषी विज्ञान केंद्रात बसविल्या जाणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोडल अधिकाऱ्यांच्या दोनदिवसीय प्रशिक्षणास शुक्रवारपासून (ता. ६) औरगाबादेत सुरवात झाली.

 पुणे ‘अटारी’ झोनअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांतील २१ कृषी विज्ञान केंद्राच्या नोडल अधिकाऱ्यांना केंद्राविषयी माहिती देण्यासाठी शास्त्रज्ञांचा चमू औरंगाबादेत दाखल झाला. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात या प्रशिक्षणाला सुरवात झाली. शास्त्रज्ञांमध्ये आयएमडीचे (पुणे) प्रमुख डॉ. आर. ए. चटोपाध्याय, डॉ. के. घोष, डॉ. आर. बाला सुब्रमण्यम्‌, ‘अटारी’चे संचालक डॉ. लखनसिंग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. पी. जी. इंगोले, ग्रामीण कृषी हवामान सेवेचे डॉ. कैलास डाखोळे आदी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित झाले.

गुजरातमधील ९, गोव्यातील २, तर महाराष्ट्रातील दहा मिळून २१ कृषी विज्ञान केंद्रांचे नोडल अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणाच्या उद्‌घाटनानंतर अटारी पुणेचे संचालक डॉ. लखन सिंग यांनी पुणे अटारीअंतर्गत येणाऱ्या सर्व २१ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कृषी हवामान संदेश शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणार असल्याचे सांगितले. उद्‌घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी, तर प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी आभार मानले.

तीन राज्यांतील २१ कृषी विज्ञान केंद्रांच्या नोडल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात पहिल्याच दिवशी सद्यस्थितील कृषी हवामान संदेश प्रणालीचा आढावा घेण्यात आला. कृषी हवामान संदेश प्रणाली सेवा आणि त्यासंबंधी नोंदी, कृषी हवामान संदेशाद्वारे हवामान अंदाज, दैनिक हवामान माहिती, हवामान अंदाज, पिकांची अवस्था, स्थिती आणि विविध पिक निगडित माहितीच्या आधारे कृषी हवामान संदेश तयार करणे, कृषी हवामान संदेश प्रसारण, भारतीय हवामान विभाग आणि संबंधित संकेत स्थळ हाताळणी आदींविषयी नोडल अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com